राष्ट्रीय

शनिवारी महाशिवरात्री; कशी करावी प्रभु वैद्यनाथाची विधीवत पुजा

प्रदोष आणि महाशिवरात्री चा तब्बल ११ वर्षांनी जुळून आला दुर्मिळ योग

महाशिवराञीचा महापर्वकाळ त्यात तब्बल अकरा वर्षांनी प्रदोष आणि महाशिवराञ असा दुर्मिळ योग यावर्षी जुळून आला आहे. अशा या महापर्वकाळी प्रभू वैद्यनाथांचे शास्ञोक्त दर्शन घेण्याचा विधी महर्षी व्यासांनी सांगीतला आहे. त्या नुसार भावीकांनी विधीवत व्रत आणि दर्शन घेतले तर तो भावीक जन्म मरणाच्या फे-यातून मुक्त होऊन, कैलासपदाचा अधिकारी होतो. तो विधी परळी वैद्यनाथ पंचक्रोशीचे अभ्यासक गोपाळ रावसाहेब आंधळे यांनी शिवभक्तांसाठी आपल्या लेखनातून दिला आहे.

असे करा महाशिवरात्री चे व्रत

ही सप्तपुरी कांती पुरी/मोक्षदायक भूमी वरी/जेथे ज्योतिर्लिंग राज्य करी/ज्ञानहिन परी तरतील ॥
माघ कृ. अयोदशी म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसी
दिवसात केवळ एक वेळ भोजन करावे. मनातून क्रोध सोडून शांत वृत्तीने रहावे. स्त्रीसंग वर्ज ठेवावा. दुसरे दिवशी म्हणजे महाशिवराञी च्या दिवशी सूर्य उद‌याच्या उगोदर झोपेतून उठावे प्रभू वैद्यनाथाचे नामस्मरण करावे. प्रातविधी करून स्नान करावे. नंतर अग्नि पुजा करावी. त्यानंतर आपल्या घरची नित्य पूजा करावी. आणि नंतर संकल्प मंत्र उच्चार करून महाशिवरात्री व्रत धारण करावे.

महाशिवरात्री दिवशी निरंकार उपवास धरावा. किंवा फराळी उपवास करावा. प्रभू वैद्यनाथाचे निरंतर ध्यान करावे. पंचाक्षरी मंत्र जप दिवसभर करावा.

पहिल्या प्रहरी अर्पण करा आंब्याचा तौर!

महाशिवराञी च्या दिवशी पहिल्या प्रहरी मंदीरात जावे सर्वप्रथम दक्षिण मुखी श्री सिद्धीविनायक गणेशाचे दर्शन घ्यावे. आणि वैद्यनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगाची ॐ नमो शिवाय या मंञाने षोडशोपचार पुजा करावी. सकाळी पिंडीवर केवळ आंब्याचा तोर अर्पण करावा. . ही झाली पहिल्या प्रहरची पुजा .

दुसऱ्या प्रहरी अर्पण करावीत कुसुंबफुले!

दुसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारी परत वैद्यनाथ मंदीरात दर्शनासाठी जावे. पिंडीवर कुसुंब फुले अर्पण करावीत. घृत पंचामृत, तांदुळ अक्षदा, गुगुळाचा धूप, तुपाचा दिवा प्रभू वैद्यनाथा समोर लावावा. गीत गायण करावे.

तिसऱ्या प्रहरी अर्पण करा पंचामृत आणि बेलपत्र

तिसऱ्या प्रहरी म्हणजे सूर्य मावळतीच्या वेळी परत प्रभू वैद्यनाथांचे दर्शनासाठी जावे प्रभू वैधनाथाचे पिंडीवर गायीचे शुद्ध दूध अर्पण करावे. मध, साखर आणि केळी आणि बेलपत्र अर्पण करावे.

प्रभू श्री वैद्यनाथांच्या शिवलिंगावर बेलपञ अर्पण करतांना म्हणावयाचा मंञ पुढिल प्रमाणे.
कांतीपूर निवासिना
वैद्यनाथपूजनम्
कोटिकन्यामहादानं, एकबिल्वं वैद्यनाथार्पणम् . नंतर उडीद मिश्रीत प्रसाद अर्पण करावा.

चौथ्या प्रहरी शयन आरती!

चौथ्या प्रहरी म्हणजे रात्री शयण आरती च्या वेळी प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी जावे पिंडीवर शुद्ध जल अर्पण करावे. गंध, पुष्प, धूप,दिप नैवेद्य अर्पण करुण प्रभू वैद्यनाथांची आरती करावी. आणि सो: ह सुत्री प्रदक्षिणा करावी.

चार प्रहर करा दर्शन व पुजा; दुसऱ्या दिवशी शिवार्पण

अशा प्रकारे महाशिवरात्री दिवशी चार प्रहर दर्शन व पूजा करून महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरी मांडलेली पूजा शिवार्पण करावी त्यावेळी मनोभावे प्रार्थना करावी. हे प्रभू वैद्यनाथा महादेवा, ज्योर्तिलिंग सदाशिवा , पार्वती वल्लभ आदी देवा, मी चार प्रहर पूजा केली, जागर केला चार वेळी आपण संतोषी व्हावे हे
निळकंठा विश्वेश्वरा आपण संतोषी व्हावे. प्रभू वैद्यनाथ समर्पयामी ! नंतर ब्राह्मण भोजन व दक्षणा देवून आशिर्वाद घ्यावा.

अशा प्रकार शिवरात्री वृत्त पूर्व करणा-या शिवभक्तांच्या सर्व मनोकामना प्रभू वैद्यनाथ पूर्ण करतो . त्यास सिद्धी आणि उत्तम निरोगी आरोग्य लाभते. जन्म मरणाच्या फे-यातून मूक्त होऊन कैलासपदाचा अधिकारी होतो.


कांतीपूरीचा राणा वैद्यनाथ लिंगरूपी/
धन्वंतरी पिंडी दिव्य झळाळी/
शाळीग्रामलिंग भवरोग हारी/
तुजवीण वैद्यनाथा मज कोण तारी ॥

आपला
गोपाळ रावसाहेब आंधळे
मोबाईल 9823335439
gopalandhale007@gmail.com

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker