स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मारकाचे अंबाजोगाईत भुमीपुजन


योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या परिसरात १२ फेब्रुवारी रविवार रोजी जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते पू.स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्तीसंग्राम स्मृती स्थळ भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे माजी सहसचिव पी.एस .जोशी,ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ तिवारी, माजी संचालिका डॉ.मंदाताई वैद्य,ज्येष्ठ सल्लागार ऍड व्ही.के.चौसाळकर,संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे,उपाध्यक्ष अँड. शिवाजीराव कराड,कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर,माजी प्राचार्य हरीष देशपांडे ,पी एस कुलकर्णी ,सी.डी.भंडारी डॉ.उद्धव शिंदे ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब गाठाळ, पौळ गुरुजी आदी उपस्थित होते.
१९१७ साली येथील भाऊसाहेब चौसाळकर, केशवराव कुर्डूकर, श्रीधरपंत सोमण,नारायणराव जोशी रघुनाथराव नागापुरकर आदींनी लोकमान्य टिळकांच्या धोरणानुसार राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मराठी माध्यमातून शाळा सुरू केली स्वामीजी ,बाबासाहेब परांजपे यांच्या पदस्पर्शाने व सहभागाने योगेश्वरी शिक्षण संस्थेला नवचैतन्य प्राप्त झाले या संस्थेने अनेक विद्यार्थी घडविले तालुकास्तरावरील पहिले महाविद्यालय म्हणून ओळखले जाणाऱ्या योगेश्वरी विज्ञान महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर उच्च शिक्षणाचा प्रारंभ झाला या सर्व मराठवाड्याच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे ही मराठी माध्यमाची शाळा म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रमुख केंद्र होती या आठवणी कायमस्वरूपी जतन करून ठेवल्या तरच येणाऱ्या पिढ्यांना याचा अनुभव येईल म्हणून स्मारक आणि स्मृती उभे करण्याचा निश्चय केलेला आहे. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी देणग्या दिल्या.कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ गणेश पिंगळे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमास संस्थेचे संचालक कर्मचारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.