सर्वे भवन्तु सुखिन: हाच लोकशाही चा आत्मा असला पाहिजे;सुदर्शन रापतवार
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230208_183616-300x190.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230208_183616-300x190.jpg)
स्वातंत्र्य पुर्व काळापासून भारत देशात लोकशाही पध्दतीनेच राज्यकारभार चालत होता याच धर्तीवर स्वातंत्र्यानंतर लोकशाही अस्तित्वात आली. असे सांगत “सर्वे भवन्तु सुखिन:” हाच आज अस्तित्वात असलेल्या लोकशाही चा आत्मा असला पाहिजे असे मत ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी व्यक्त केले.
“वायसीएम” चे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने श्रीपतरायवाडी येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात लोकशाही व मतदार जागृती या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. धनंजय खेबडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. इंद्रजित भगत, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. अनंत मरकाळे, ज्येष्ठ कवी राजेंद्र रापतवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यापुर्वीही राजकारभार लोकशाही पध्दतीनेच
आपल्या विस्तारीत भाषणात सुदर्शन रापतवार पुढे म्हणाले की, साधारणतः भगवान गौतम बुद्ध ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर ह्या सर्व राजवटींच्या कालावधीतील राज्यांचा कारभार हा लोकशाही पध्दतीने चालवण्यात येत असल्याचे दिसून येते. भगवान गौतम बुद्ध यांचे वडील सिध्दोधन हे वंशपरंपरागत राजघराण्यातील राजे नव्हते तर ते सामान्य प्रजेमधुन निवडल्या गेलेले राजे होते. त्याकाळी राजाने राजगादी वर बसण्यापुर्वी उपस्थित प्रजेला अभिवादन करीत राज्यातील सर्व प्रजेचा मी माझ्या मुला-बाळा प्रमाणे सांभाळ करेण, या कामात माझ्या कडुन जरी काही चुक झाली तर राजगादी वरुन खाली उतरण्याचा अधिकार या प्रजेला आहे, असे सांगून राजगादी वर बसण्याची प्रथा होती.
याच कालावधीत राज्य चालवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी म्हणून तयार करण्यात येणा-या मंत्रीगणातील सदस्य ही त्या त्या विभागातील लोक निवडून देत असत आणि प्रजेच्या हिताचे निर्णय हे मंत्री गण आणि राजे घेत असत.
“सर्वे भवन्तु सुखिन:” हाच लोकशाही चार आत्मा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230208_183748-300x127.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230208_183748-300x127.jpg)
भारतात स्वातंत्र्यानंतर देशाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी व देश एकसंध ठेवण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात येवून राज्यघटना निर्माण करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या या समितीने निर्माण केलेल्या या संविधानाचा आत्मा ही “सर्वे भवन्तु सुखिन :” भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या “भवतु सब्ब मंगलम” आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या ” जो जे वांच्छिल तो ते लाभो” या त्रिसूत्री वरच आधारलेला आहे, एवढेच नव्हे तर संविधानाचा आत्माच ही त्रिसूत्री आहे असे मत सुदर्शन रापतवार यांनी व्यक्त केले.
भारतात आणि देशात अस्तित्वात असलेल्या लोकशाही त जशा अनेक चांगल्या बाबी आहेत तशा अनेक त्रुटी ही आहेत. लोकशाही मध्ये असलेल्या यात्रुटी दुर करण्याचे प्रयत्न आता सुरु आहेत, पण या त्रुटी सुधारण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल हे सांगता येणार नाही.
लोकांना त्यांच्या लायकी प्रमाणेच सरकार मिळते
आजच्या लोकशाही वर भाष्य करतांना सुदर्शन रापतवार यांनी “इन डेमॉक्रॉसी पीपल गेट व गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व” या वाक्याप्रमाणे “लोकशाही मध्ये लोकांना त्यांच्या लायकी प्रमाणेच सरकार मिळते” असे सांगत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जेंव्हा लोकांच्या कल्याणाऐवजी स्वतः च्या कल्याणात बुडून जातात तेंव्हा ही जबाबदारी ही निवडुन दिलेल्या लोकांवरच येते असे सांगितले.
आजच्या परिस्थितीत देशात, राज्यात आणि आपल्या गावात खरी लोकशाही राबवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन सुदर्शन रापतवार यांनी केले.
प्रा. डॉ. धनंजय खेबडे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230208_183541-300x173.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230208_183541-300x173.jpg)
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. धनंजय खेबडे यांनी आजच्या लोकशाहीवर प्रखर भाष्य करीत संविधानात सांगितलेल्या किंवा संविधानाला अभिप्रेत असलेल्या लोकशाही ची संकल्पना राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी केले प्रयत्न
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230208_183648-300x273.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230208_183648-300x273.jpg)