Uncategorizedमहाराष्ट्र
दारु पाजवून कु-हाडीने केले वार;. पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल


दारू पाजून कुन्हाडीने व चाकूने वार करून रक्तबंबाळ केल्याची घटना १ फेब्रुवारीला एकूरका येथे घडली. याप्रकरणी पती, पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद अरुण केदार (२९, रा. एकुरका) असे जखमीचे नाव आहे. १ फेब्रुवारी रोजी साहेबराव फुलचंद नागरगोजे याने दारू पाजून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
डोक्यात कु-हाडीने मारून रक्तबंबाळ करून मुका मार दिला. चाकूने वार करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असा विनोद केदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.