Uncategorizedमहाराष्ट्र

डॉ. अरुण डावळे मॅक्सिकॉनच्या “जीवन गौरव पुरस्काराने” सन्मानित

प्रख्यात सर्जन प्रा.डॉ. अरुण डावळे यांना मॅसिकॉन संघटनेच्या वतीने संघटनेच्या लातुर येथे झालेल्या स्टेट कॉन्फरन्स मध्ये जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
देश भरातील सर्जन यांना एकत्रित करुन नवनवीन शोध व संशोधन प्रक्रियेचे आलं प्रदान करणे सोयीचे व्हावे म्हणून ऑल इंडिया सर्जन असोसिएशन नावाची एक संघटना देश पातळीवरील कार्यरत आहे. या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक राज्यात स्वतंत्र संघटना कार्यरत आहेत. महाराष्ट्रात या संघटनेच्या अंतर्गत काम करणारी महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ सर्जन ही संघटना गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सर्जन या संघटनेशी जोडल्या गेले आहेत.


या संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात प्रति वर्षी राज्यातील उत्कृष्ट सर्जन ची निवड करुन त्यांनी आज पर्यंत सादर केलेले प्रबंध, शस्त्रक्रियांबाबतचे विवरण त्यांचे कौशल्य व एकुण शल्यचिकित्सेतील त्याचा अभ्यास पाहुन नामवंत सर्जन ची निवड करुन त्याचा जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो.
यावर्षी महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ सर्जन या संघटनेचे 45वे वार्षिक अधिवेशन लातुर येथे 2ते ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. या अधिवेशनात प्रख्यात सर्जन प्रा.डॉ. अरुण डावळे यांचा मॅसिकॉनचे मावळते अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र शिंदे, संघटनेचे पदाधिकारी डॉ. दिनकर काळे, डॉ. अजय पुनपाळे व इतर मान्यवरांचे उपस्थितीत प्रा.डॉ. अरुण डावळे यांचा जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार होता, परंतु संसदेच्या अर्थ संकलपीय अधीवेशना मुळे ते येऊ शकले नाहीत.
डॉ. अरुण डावळे यांना महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ सर्जन या संघटनेच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, आ. नमिता अक्षय मुंदडा, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व इतरांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker