राष्ट्रीय

‘हिंडनबर्ग’चा अहवाल; गौतम अदानी यांच्या संपतीत 6 अब्ज डॉलरची घट?

आशिया खंडातील चौथे सर्वांत श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांना एका नकारात्मक अहवालाने चांगलाच घाम फोडला आहे. या अहवालामुळे त्यांच्या नोंदणीकृत कंपन्यांच्या समभागांची पळता भुई थोडी झाली. त्यामुळे अदानींच्या संपत्तीमध्ये सुमारे सहा अब्ज डॉलरची (४,८९,२०,६४,००,००० रुपये) घट झाली. या अहवालात मांडण्यात आलेल्या तथ्यांवर अदानी समूहाने आपली बाजू मांडली असून, आता न्यायालयीन लढाईचे शस्त्र उपसण्याचीही तयारी केली आहे. हा खळबळजनक अहवाल सादर करणाऱ्या कंपनीविषयी…

नकारात्मक अहवाल दिल्याने अमेरिकी रिसर्च कंपनी ‘हिंडनबर्ग’ (Hindenburg Research) खूपच चर्चेत आली आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट येथून इंटरनॅशनल बिझनेस या विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर ते ‘फॅक्टसेट रिसर्च सिस्टीम्स’ या डेटाकंपनीत रुजू झाले. तेथे ते ‘इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांचे व्यवहार पाहत असत. त्यानंतर त्यांनी २०१७मध्ये आपली शॉर्ट सेलिंग कंपनी ‘हिंडनबर्ग’ची सुरुवात केली.

हिंडनबर्ग रीसर्च’ चे काम काय?

‘हिंडनबर्ग रिसर्च’ ही एक फॉरेन्सिक फायन्शियल रिसर्च कंपनी असून, ती इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्हजचे विश्लेषण करते. कोणत्याही कंपनीत होणारी आर्थिक गडबड शोधून तिचा विस्तृत अहवाल तयार करून प्रकाशित करण्याचे काम ‘हिंडनबर्ग’ करते. त्यामध्ये ताळेबंदातील गडबड, व्यवस्थापनातील दोष आदी बाबींवर प्रकाश टाकला जातो. नफा कमविण्यासाठी गडबड आढळलेल्या कंपनीला ‘हिंडनबर्ग’ तर्फे ‘चॅलेंज’ केले जाते. प्रत्येक कंपनीतील ‘मानवनिर्मित आपत्तीं’वर (मॅन मेड डिझास्टर) आम्ही बोट ठेवतो, असे ‘हिंडनबर्ग’ च्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे.

१६ कंपन्यांतील गोंधळ आणला उजेडात!

सन २०१७मध्ये सुरुवात केलेल्या ‘हिंडनबर्ग’ने आतापर्यंत १६ कंपन्यांमधील आर्थिक गडबड चव्हाट्यावर आणली आहे. त्यामध्ये ‘ट्विटर’मधील गोंधळावरील अहवाल खूप गाजला. ‘हिंडनबर्ग’तर्फे जगभरातील सर्वच कंपन्यांमधील चुकीच्या गोष्टींचा लेखाजोखा ठेवते आणि नंतर ते अहवालातून जाहीर करते. संबंधित कंपन्यांच्या विरोधात अहवाल जाहीर करूनच ‘हिंडनबर्ग’ नफा कमवते. आता ‘हिंडनबर्ग’ने गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे.
अदानी समूहावर प्रश्नांची सरबत्ती अदानी समूहासंदर्भात (Adani Group) प्रकाशित झालेल्या अहवालात ‘हिंडनबर्ग’ने सर्वच कंपन्यांच्या कर्जांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘हिंडनबर्ग’ च्या दाव्यानुसार, सात कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली असून, त्यांचे बाजारमूल्य फुगविण्यात
आले आहे. ‘हिंडनबर्ग रिसर्च’ च्या अहवालात अदानी समूहाच्या कारभारावर ८८ प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

अहवालानंतर आली त्सुनामी

‘हिंडनबर्ग’च्या अहवालाचा अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे सर्वच कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरले. हा अहवाल आल्यानंतर बुधवारी अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग सहा ते सात टक्क्यांपर्यंत घसरले. त्याचा परिणाम म्हणून गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये मोठी घटही झाली. घसरले. त्याचा परिणाम म्हणून गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये मोठी घटही झाली.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker