केज येथील विखेपाटील कारखान्यांची निवडणुक एकतर्फी होण्याचे मार्गावर!


२१ संचालकांसाठीहोणिर निवडणुक
खासदार रजनी पाटील व माजी मंत्री अशोक पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या केज तालुक्यातील उमरी येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. २१ जागांसाठी संचालकांच्या निवडीसाठी ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांची बुधवारी छाननी झाली. विरोधी गटाचे २२ अर्ज अवैध ठरले. तर ४१ अर्ज जणांचे अर्ज वैध ठरले. विरोधी गटाचे अर्ज अवैध ठरल्याने निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे आहेत.
१६ फेब्रुवारी लाख होणार चित्र स्पष्ट
अर्जाची छाननी १ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. यावेळी विरोधी गटाचे सर्वच्या सर्व एकूण २२ उमेदवारी अर्ज विविध कारणाखाली अवैध ठरविण्यात आले आहेत. यामुळे ही निवडणूक आता एकतर्फी होणार हे निश्चित झाले आहे. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर चित्र स्पष्ट होणार
असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी दिली.
२२ उमेदवारी अर्ज अवैध
निवडणुकीसाठी शेकापचे मोहन गुंड यांनी साखर कारखाना बचाव पॅनलच्या माध्यमातून २२ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ते सर्वच्या सर्व अर्जी विविध आक्षेपामुळे अवैध ठरले आहेत.
७४० सभासदांची नांवेच वगळली!
विखे पाटील साखर कारखान्याची वेगवेगळी बाकी दाखवून साखर कारखाना बचाव पॅनलचे सर्वच्या सर्व २२ उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान, ७४० ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नावे ऐनवेळी मतदान यादीतून वगळण्यात आल्यामुळे त्यांना यादीत सामावून घेण्यासाठी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शेकापचे भाई मोहन गुंड यांनी दिली.