विकसित भारत बनण्यासाठी आत्मनिर्भर होण्याची गरज; गौरीशंकर स्वामी यांचे मत


विकसित भारत बनविण्यासाठी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे.
राष्ट्र विकासासाठी बेसिक सांयस माहिती असणे आवश्यक आहे.परीक्षा पेपर्स सोडवा.अनुभवाने भिती निघून जाते.मनाची एकाग्रता वाढवा.निरंतर अभ्यास करा.ज्ञान दिल्याने वाढते.सतत ज्ञान ग्रहण करा.वृत्तपत्रांचे वाचन करा.आपण घडलो तरच राष्ट्र घडू शकते.
शिक्षण घेतांना स्वतः शीच तुलना करा!
शिक्षण घेताना स्वतःशी तुलना करा.अभ्यासात सातत्यता ठेवा.उद्दीष्ट मोठे ठेवा. राज्य व राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हा.यामुळे बुद्धीमत्ता विकसित होत असते.विद्यार्थी दशेत प्राप्त केलेले ज्ञान भविष्यात मोलाचे ठरते.ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे.जसे आपणास शालेय वयात संस्कार मिळालेले असतात तेच पुढील आयुष्यात महत्वाचे ठरते.असे मत अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांनी व्यक्त केले.
येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त दि.४ फेब्रुवारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड शिवाजीराव कराड हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्राध्यापक नागनाथ गरजाळे, संस्था कोषाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव लोमटे,ॲड.संतोष पवार,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाठक ,उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, पर्यवेक्षक रवी मठपती विवेकानंद कुलकर्णी,पर्यवेक्षक सुभिष शिंदे ,शिक्षक प्रतिनिधी भागवत मसने, गणेश कदम, संमेलनाचे प्रमुख वैशाली भुसा, शिवकन्या सोळुंके, विद्यार्थी संसदेचे उपाध्यक्ष प्रणव रामदासी, सचिव सुशांत संगापुडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
प्राध्यापक नागनाथ घरजाळे यांनी क्रियाशील राहा.
प्रयत्नाची पराकष्टा केल्यास हमखास यश मिळते. मन लावून अभ्यास केल्यास बुद्धी कुशाग्र होते.जगात सर्वात पवित्र ज्ञान आहे.कर्माला ज्ञानाची जोड नसेल तर आयुष्य अपूर्ण असते. असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ऍड. शिवाजीराव कराड होते अध्यक्ष
अध्यक्षीय समारोपात ॲड.शिवाजीराव कराड यांनी स्नेहसंमेलन म्हणजे आनंदाचा सोहळा असून विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहावे.थोर व्यक्तींचा आदर्श समोर ठेवा.मोबाईल हा भयानक व्यसन आहे.आवश्यक तेव्हांच मोबाईल वापरा.स्वामी रामानंद तीर्थ यांनी ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची सांगड घालून आदर्श संस्था आणि विद्यार्थी निर्माण केल्याचे सांगितले.दरम्यान मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले.मुख्याध्यापक अपर्णा पाठक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सहशिक्षक बालाजी मसने, प्रतीक्षा गंगणे, सुचिता कडके यांनी केले.रवी मठपती यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले.मुख्याध्यापक अपर्णा पाठक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सहशिक्षक बालाजी मसने, प्रतीक्षा गंगणे, सुचिता कडके यांनी केले.रवी मठपती यांनी उपस्थितांचे आभार मानले.