१९ मार्च अन्नत्याग आंदोलन;. ५ फेब्रुवारी ला अंबाजोगाईकरांची बैठक


१९ मार्च; अन्नत्याग आंदोलन निमित्ताने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी, या कार्यक्रमाचा निरोप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा यासाठी, ५ फेब्रुवारी, रविवारी सायंकाळी ५ वाजता नगर परिषद मिटींग हॉल मध्ये एका व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


या बैठकीच्या अध्यक्षस्थानी किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब हे राहणार असून या महत्त्वपुर्ण बैठकीत अंबाजोगाई येथे १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेच्या नियोजनाचे, सामुहिक उपवास सांगता कार्यक्रम यशस्वी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.


या बैठकीस अंबाजोगाई शहर आणि परिसरातील किसान पुत्रांनी उपस्थित राहुन आवश्यक त्या सूचना कराव्यात व १९ मार्च रोजी घेण्यात येणारा कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीने, एक दिशादर्शक कार्यक्रम होईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार तसेच अनिरुद्ध चौसाळकर, वैजनाथ शेंगुळे, अनिकेत डिघोळकर, प्रा. शैला बरुरे, बालासाहेब केंद्रे, ऍड. संतोष पवार, किरण असरडोहकर, आशा हबीब, वसंतराव मोरे, कालिदास आपेट, अच्युत गंगणे व इतरांनी केले आहे.