डॉ. शिवाजीराव निलंगेकर स्मारकाचे ९ फेब्रुवारी रोजी होणार अनावरण


माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण सोहळा माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत दि.9 फेब्रुवारी 2023 गुरुवारी रोजी दुपारी 2. वाजता महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे होणार आहे.
ना. रावसाहेब दानवे, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण व इतरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, श्रीमती सुशालाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी खासदार, माजी खासदार, आमदार, माजी मंत्री व अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.


यांचा आहे पुढाकार
कर्मयोगी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक समितीच्या सदस्या माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, डॉ.सौ.चंद्रकला अरुण डावळे, डॉ. शरद पाटील निलंगेकर, प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, विजय पाटील निलंगेकर, माजी पालकमंत्री तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर हे अनावरण सोहळ्यासाठी पुढाकार घेत आहेत.