महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या निमंत्रित सदस्यपदी राजकिशोर मोदी यांची नियुक्ती
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0196-300x175.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0196-300x175.jpg)
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या निमंत्रित सदस्यपदी राजकिशोर मोदी यांची नियुक्ती झाली आहे . नुकतेच फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी राजकिशोर मोदी यांना त्यांच्या नियुक्ती चे पत्र दिले आहे .
राजकिशोर मोदी यांचे सहकार क्षेत्रातील मागील ३०वर्षा पासूनचे कार्य लक्षात घेऊन व त्याची दखल घेऊन फेडरेशनने राजकिशोर मोदी यांना फेडरेशन च्या निमंत्रित सदस्य पदी त्यांची नियुक्ती केली आहे .
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन गेली ३२ वर्षे महाराष्ट्रातील १६००० चे वर नागरी सहकारी / पगारदार सहकारी/महिला सहकारी/ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांची नेतृत्व करणारी राज्य पातळीवरील अधिकृत एकमेव शिखर संस्था आहे. या संस्थेच्या संपन्न झालेल्या संचालक मंडळ सभेत राजकिशोर मोदी यांनी पतसंस्था चळवळीत आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून करीत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेवून व त्यांच्या फायदा पतसंस्था फेडरेशन ला करून घेण्यासाठी फेडरेशन च्या वतीने मोदी यांची
निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
या पदाच्या नियुक्तीचे पत्र नुकतेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने देण्यात आले असून त्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने संपन्न होणारे प्रशिक्षण शिबीर, विविध मेळावे, अधिवेशने यात आपल्या संस्थेचा व इतर संस्थांचाही सहभाग वाढवावा. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे मुखपत्र असलेले क्रेडिट न्यूज बाबत जेथे पतसंस्थांची शाखा तेथे क्रेडिट न्यूज या मोहिमेअंतर्गत आपल्या परिसरातील सर्व प्रकारच्या पतसंस्थांच्या सर्व शाखांना क्रेडिट न्यूजचे सभासद करून घ्यावे व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची सभासद संख्या वाढविणेसाठी देखील प्रयत्न करावेत अशा प्रकारची अपेक्षा देखील फेडरेशन च्या वतीने अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी राजकिशोर मोदी यांच्या कडून केल्या आहेत.