महात्मा गांधी यांना समजावून घेणे आवश्यक; डॉ. श्रीराम जाधव
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230130_162720-1024x430.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230130_162720-1024x430.jpg)
महात्मा गांधींना समजून घेणे आवश्यक आहे . गांधीजींविषयी पंच्याहत्तर वर्षांपासून विष पेरले जात आहे . गांधीजींना समजून घेण्यासाठी सामान्य होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन औरंगाबाद येथील विचारवंत,अभ्यासक डॉ श्रीराम जाधव यांनी केले .
येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने 22 जानेवारी ते 30 जानेवारी 23 या कालावधीत जागर लोकशाहीचा आपणा सर्वांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महात्मा गांधी पुण्यतिथी, हुतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. श्रीराम जाधव यांनी महात्मा गांधी समजून घेताना या विषयावर आपली भूमिका मांडली. गांधीजी त्यागी, प्रामाणिक,सत्य बोलणारे असे होते. त्यांच्या आचार विचारात तफावत नव्हती.मोहन ते महात्मा हा समर्पणाचा प्रवास होता. 1915 साली गांधीजी विदेशातून भारतात आले व देशातील सामान्य माणसापर्यंत पोहोंचले . राष्ट्रीय आंदोलनात उतरण्यापूर्वी देशाला, सामान्य जणांना समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता असे मत डॉ.श्रीराम जाधव यांनी व्यक्त केले.गांधीजींना जाती- धर्माची चौकट मान्य नव्हती सामाजिक समतेचा पुरस्कार केला होता.महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात विरोधाभास होता पण ते एक दुसऱ्याचे शत्रू नव्हते. गांधीजींना देशातील जनतेला निर्भय बनवायचे होते असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश खुरसाळे यांच्या संबोधनाने झाला.गांधीजींनी बहुजनांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न केला म्हणून गांधीजींची हत्या झाली अभिजन वर्गाला हे मान्य नव्हते. बहुजन समाजाला गांधीजी आपल्यासाठी लढत आहेत हे समजलेच नाही. युवकांनी महात्मा गांधीना समजून घेण्यासाठी अभ्यास,वाचन केले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. सुरेश खुरसाळे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय जागर लोकशाहीचा या कार्यक्रमाच्या संयोजिका तथा महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या संचालिका डॉ शैलजा बरुरे यांनी करून दिला. गांधीजींच्या सत्य, अहिंसा या तत्वांना जगाने मान्यता दिली आहे. गांधीजींना समजून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील नाट्य शास्त्र विभाग प्रमुख डॉ संपदा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी मंडळाचे प्रमुख डॉ धनाजी आर्य यांनी केले. या कार्यक्रमाला योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर, कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे, सहसचिव डॉ साहेबराव गाठाळ, प्रा एन.के. गोळेगावकर, संचालक मंडळातील सदस्य, शोभाताई खुरसाळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर, उपप्राचार्य डॉ रमेश सोनटक्के महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.