शेख उमर फारुक यांना अबुल चाऊस आदर्शव्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर
गेल्या 18 वर्षापासून सामान्य जणांच्या कुटूंबियांचा आधारवड ठरलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारुक यांना बीड येथील उर्दू दैनिक अलहिलाल टाईम्सच्या वतीने दिला जाणारा अहेमद बिन अबुद चाऊस आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार जाहिर करण्यात आला असून त्याचे वितरण सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी बीड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे. शेख उमर फारुक यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वस्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.
शेख उमर फारुक यांनी शैक्षणिक व अर्थ क्षेेत्रात मोठे योगदान दिले असून दोन्ही क्षेत्रांना उंचीवर नेण्याचे काम त्यांच्या हातून झाले आहे. एक प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून त्यांचे कार्य हे सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राहिलेले आहे. तर अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून गेल्या 18 वर्षात हजारो लोकांच्या जीवनात नवे आनंदाचे पर्व निर्माण केले आहे. कारण गेल्या 18 वर्षात हजारो कुटूंबियांना आर्थिकदृष्टट्या सक्षम करुन त्यांच्या संसाराच्या उत्कर्षासाठी हातभार लावला आहे. पतसंस्था म्हणून केलेले काम हे उल्लेखनीय आणि कौतुकास्पद राहिलेले आहे. या पतसंस्थेने व्यवसाय किंवा ग्राहक हे शब्द वापरले नाहीत. तर कुटूंब आणि सहकारी असा शब्द प्रचलित करुन अनेकांना या परिवारात सामावून घेतले आहे. अलखैर नागरी पतसंस्था ही नव्या अर्थ क्षेत्रातील मॉडल बनले आहे. शेख उमर फारुक व त्यांचे सर्व सहकारी यांचे यात मोठे योगदान राहिलेले आहे. शेख उमर फारुक यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून दरवर्षी उर्दू दैनिक अलहिलाल टाईम्सच्या वतीने अहमदबिन अबुद चाऊस आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कारासाठी यांची निवड केेलेली आहे. याचे वितरण सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी बीड येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केले जाणार आहे. शेख उमर फारुक यांच्यासोबतच सामाजात जे आदर्शदायी काम करीत आहेत. त्यांनाही पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार असल्याची माहिती दैनिक अलहिलाल टाईम्सचे संपादक खमरुल इमान खान युसुफ जई यांनी दिली आहे.