महाराष्ट्र

झेंडावंदनाला जातानाचा रील बनवणे जीवावर बेतले; १ मयत : ३ जखमी

दुचाकीवर रील तयार करणं विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं आहे. परभणीमध्ये झेंडावंदनला एकाच गाडीवर जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा रील तयार करताना अपघात झाला… यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. झेंडावंदनाला जाताना मेला या चित्रपटातील डर है तुझे किस बात का? या गाण्यावर विद्यार्थी रील तयार करत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

परभणीच्या पाथरी सोनपेठ मार्गावर आज सकाळी शाळेत झेंडावंदनासाठी जाणाऱ्या नववीच्या चार विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाला. ज्यात 4 ही जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर या 4 जणांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात हे चार जण शाळेकडे जात असताना पाथरी सोनपेठ मार्गावर चक्क रील बनवत होते. हा व्हिडीओ अपघातापूर्वी काही वेळ अगोदरचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे एका दुचाकीवर 4 जण त्यात मोबाईल वर रिल बनवणे या 4 ही जणांना चांगलेच महागात पडले आहे..यात जो गाडी चालवतोय तो स्वप्नील चव्हाण असून त्याचा हा अपघातात एक हात तुटलाय.. तर शंतनू सोनवणे या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजन आहे. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार

आज देशभरात आनंदाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. परभणीत याच दिवशी दुर्दैवी घटना घडली असून ध्वजारोहणासाठी शाळेला जात असलेल्या चार विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ऑटोने धडक दिली. ज्यात चारही विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यांना उपचारासाठी आंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान या अपघातातील शंतनू सोनवणे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.

प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनासाठी पाथरीच्या कानसुर येथील चक्रधर स्वामी विद्यालयाकडे डाकू पिंपरी येथील नववीचे 4 विद्यार्थी एकाच दुचाकीवर जात होते. त्यांच्या दुचाकी आणि ऑटोचा भीषण अपघात झाला. हा अपघात सकाळी 7 वाजता घडला ज्यात डाकू पिंपरी येथील स्वप्नील चव्हाण, राहुल तिथे,शंतनू सोनवणे, योगानंद घुगे असे 4 विद्यार्थी होते. हा अपघात इतका भीषण होता की एका विद्यार्थ्यांचे हात रस्त्यावर तुटून पडल्याचं उपस्थितांनी सांगितलं. या अपघातात शंतनू या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker