प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील चौकाचौकात संविधान व भारत मातेचे पुजन


अंबाजोगाई येथील श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. निवृत्ती दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील चौकाचौकांमध्ये भारत माता व संविधान पूजन हे संस्था पदाधिकारी , शिक्षक, उपस्थित नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले.


सौ.सुरेखा काळे यांनी उपस्थितांना अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून प्रजासत्ताक दिनाची महिती सांगीतली.
श्री.जयेंद्र कुलकर्णी यांच्या गीतमंचाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अतुल देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाहीचे महत्व सांगितले. तसेच भारतीय संविधानाच्या वाचनाची व ते समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.


याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष डॉ.श्री.अतुल देशपांडे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.निवृत्ती दराडे,शालेय समिती सदस्य श्री.किसनराव महामुनी, अर्थ समिती सदस्य श्री.अशोक पाठक, श्री.साईनाथ उपरे, उपमुख्याध्यापक श्री.संजय कुलकर्णी,पर्यवेक्षक श्री.अरूण पत्की,विभाग प्रमुख श्री.प्रशांत पिंपळे,अभ्यास पूरक मंडळ प्रमुख सौ.सुरेखा काळे, श्री.विश्वास पत्की,तसेच सर्व शिक्षक बंधु-भगीनी कर्मचारी,विद्यार्थी, उपस्थित होते. श्री.ज्ञानेश मातेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.विद्यार्थ्यांच्यासाठी खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.