ठळक बातम्या

केज मतदार संघात ३.२५ कोटींच्या ११ लिंक लाईन मंजूर; आ. नमिता मुंदडा

केज मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विद्युत पुरवठ्यात असणारा विस्कळीतपणा दूर करण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यानंतर ११ लिंकलाईन मंजूर करण्यात आल्या आहेत. यात ११ केव्हीच्या ९ आणि ३३ केव्हीच्या २ लिंकलाईनचा समावेश आहे. यासाठी एसिएफ फंडातून तब्बल सव्वा तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

विजेच्या वाढत्या मागणीमुळे केज मतदार संघातील अनेक फिडरवर आणि सद्यस्थितीतील लिंकलाईनवर प्रचंड ताण येत आहे. विद्युत पुरवठा सतत विस्कळीत होत असल्याने शेतकरी, व्यावसायिक, ग्रामस्थ हवालदिल होत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी फिडरवरील लोड विभागणी करण्यासाठी लिंकलाईन वाढविण्याची मागणी प्रशासकीय पातळीवर लावून धरली होती.

आ. मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश आले असून एसीएफ फंडातून केज मतदार संघातील ११ लिंकलाईनसाठी ३ कोटी २६ लाख ६७ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून केळगाव ते बेळगाव, धावडी ते सोनवळा, ११ केव्ही बे फॉर सोनवळा फिडर, जानेगाव ते कुंबेफळ फिडर, डीघोळअंबा, चिचखंडी, होळ ते दिपेवडगाव, ११ केव्ही बे फॉर होळ या ११ केव्हीच्या लिंकलाईन तर मालेगाव ते युसुफ वडगाव आणि मस्साजोग ते कुंबेफळ उपकेंद्रातर्गत ३३ केव्हीच्या लिंकलाईन होणार आहेत. यापैकी काही कामे प्रगतीपथावर असून काही कामे लवकरच सुरु होणार आहेत. हि कामे झाल्यानंतर फिडरवरील लोड विभागणी होऊन सदरील गावातील विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे. सदरील ११ लिंकलाईनला मंजुरी दिल्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी पालकमंत्री अतुल सावे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker