ठळक बातम्या

आशा वाघ हल्ला प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल

केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर पेट्रोल टाकून व गळा आवळून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावजयीसह पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

अगोदर भावाने तर आता भावजईने केला हल्ला

केज तहसीलच्या नायब तहसीलदार आशा दयाराम वाघ यांच्यावर सात महिन्यांपूर्वी जमिनीच्या वादातून कोयत्याने हल्ला करणारा भाऊ मधुकर वाघ हा बीडच्या कारागृहात असताना त्याची पत्नी सुरेखा मधुकर वाघ, भावजयीची आई मुंजाबाई भास्कर महाले, भावजयीचा भाऊ हरिदास भास्कर महाले, एक अनोळखी, व चालक या पाच जणांनी २० जानेवारी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास जेवण आटपून तहसील कार्यालयाकडे निघालेल्या आशा वाघ यांच्यावर भावजयी सुरेखा वाघ हिने हक्क सोडपत्रावर सही कर म्हणत त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून तर हरिदास महाले याने गळा आवळून पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या • तावडीतून सुटका करीत आशा वाघ यांनी जीव वाचविला होता. आशा वाघ यांच्या फिर्यादीवरून सुरेखा वाघ, मुंजाबाई महाले, हरिदास महाले, अनोळखी महिला, चालक या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आनंद शिंदे तपास करीत आहेत.

महिला आयोगाच्या सदस्या ऍड. संगीता चव्हाण यांनी घेतली भेट


दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या सदस्या ऍड. संगीता चव्हाण यांनी आशा वाघ यांच्यासह एएसपी पंकज कुमावत, सपोनि शंकर वाघमोडे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीता तुपसागर ( भोसले) यांनी ही त्यांची भेट घेऊन हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker