महाराष्ट्र

नवनाथ बन यांची भाजपचे माध्यम विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती

बीडच्या पत्रकारीतेमध्ये अनेक वर्ष काम केलेले आणि वृत्तवाहिनीवरील लोकप्रिय चेहरा ठरलेले नवनाथ बन यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला असून त्यांची लगेचच माध्यम विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुर येथे पक्ष प्रवेशाचा आणि नियुक्तीचा औपचारिक कार्यक्रम झाला. या संदर्भात स्वतः बन यांनी फेसबुक पोस्ट व्दारे माहिती दिली.
संघाच्या मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुर मधून या नवीन जबाबदारीला सुरुवात केली आहे. एके काळी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाचे नेतृत्व केले. आज देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उत्कृष्ट वक्ता आणि पत्रकारीतेचा प्रदिर्घ अनुभव असलेल्या नवनाथ बन यांच्यामुळे महाराष्ट्र भाजपला मोठा फायदा होईल असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटले. तर नवनाथ बन यांच्या पक्ष प्रवेशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले

बीड जिल्हा ही कर्मभूमी असलेल्या या ओजस्वी आणि तेजस्वी युवकाला भाजपने मोठी जबाबदारी दिल्यामुळे जिल्हाभर या नियुक्तीचे स्वागत होत आहे.
नवनाथ बन हे नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असून त्यांची कर्मभूमी मात्र बीड जिल्हा राहिलेली आहे. वडिल शासकिय नोकरी निमित्त बीड मध्ये असताना त्यांनी या ठिकाणी पत्रकारीतेला सुरुवात केली. उत्तम वक्ता असल्याने अनेक वक्तृत्व स्पर्धाही बन यांनी गाजवल्या. या वक्तृत्वाचा फायदा त्यांना इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये झाला. त्यामुळेचएबीपी माझा सारख्या नामांकित वृत्तवाहिनीवर त्यांना राजीव खांडेकर यांच्यामुळे संधी मिळू शकली. या वृत्तवाहिनीमध्ये त्यांनी तब्बल १३ वर्ष वेगवेगळ्या पदावर यशस्वीपणे काम केले. त्यांची संपुर्ण राज्याला चांगला पत्रकार म्हणून ओळख होऊ लागलेली असतानाच त्यांनी एबीपी माझाच्या पत्रकारीतेचा राजीनामा दिला होता. नवनाथ बन यांच्या नियुक्तीचे “माध्यम न्युज नेटवर्क” परिवाराच्या वतीने अभिनंदन!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker