२० ते २२ जानेवारी रोजी लातुर येथे होणार बालरोग तज्ञांची परीषद


बदलती जिवलशैली, वाढते प्रदुषण आणि ग्रामिण भागात वैद्यकीय सेवा पुंरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने बालरोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. लहान मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. भविष्य उज्वल करायचे असेल तर बालरोगांचे प्रमाण नियंत्रणात आणणे आवश्यक आहे या क्षेत्रातील अत्याधुनिक ज्ञान जास्तीत जास्त बालरोगतज्ज्ञांपर्यंत पोहचवून ते खेडोपाडी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने लातूर येथे होत असलेली मार्पकॉन 2023 ही बालरोगतज्ज्ञांची परिषद ज्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बालरोगाच्या विभिन्न विषयांमध्ये तज्ञ असलेले स्पीकर मार्गदर्शन करतील.
आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मिळणार मार्गदर्शन


महत्वपूर्ण विविध बाल रोगांचा नवनवीन उपाय योजना माहित होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे असे मत संयोजन समितीचे डॉ. अशोक आरदवाड (मार्पकॉन कार्यकारी अध्यक्ष ) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
मराठवाडा विभागीय बालरोग तज्ज्ञांची परिषद दि. 20 ते 22 जानेवारी दरम्यान लातूर येथे होत आहे. भारतीय बालरोग संघटना, लातूर (Indian Academy of Paediatrics, Latur) आणि कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँण्ड सर्जन्स, मुंबई (CPS, Mumbai) यांच्या संयुक्तविद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीयस्तरीय ही परिषद असून तिचा लाभ केवळ मराठवाडाच नाही तर देशभरातील बालरोगतज्ज्ञांना होणार आहे तरी या परिषदेचा लाभ जास्तीत जास्त बालरोगतज्ञ व डॉक्टरांनी घ्यावा असे आवाहन डॉ. जितेन जैस्वाल (लातूर IAP अध्यक्ष ) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गुंतागुंतीच्या आजारांवर होणार विचारमंथन
नवजात बालकांमधील श्वासोश्वासाच्या अडचणी, लहान मुलांच्या सर्दी खोकल्यापासून, मुलांचे अंथरुणात सु करणे, बालदमा, लहान मुलांवर होणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांमधील हृदय रोग, लहान मुलांमधील विषबाधा या विषयापासून ते कोव्हीड झाल्यावर बालकांच्या प्रकृतीत होणारी गुंतागुंत अशा अनेक विषयांवर या परिषदेत मंथन होणार आहे असे डॉ संदीपान साब (Organizing Secretary) यांनी यावेळी सांगितले. 20 जानेवरी रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बालरोग क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे यावेळी मार्गदर्शन होणार आहे.
बालरोग तज्ञ डॉक्टरांसाठी कार्यशाळा किशोरवयीन मुलांचे आरोग्य आणि मुलांचे भावनिक आणि मानसिक आरोग्य या तीन विषयांवर कार्यशाळा होणार आहेत.
पालक शिक्षकांसाठी परीसंवादाचे आयोजन


सामान्य जनता, शिक्षक व पालकांसाठी परिसंवाद : दिनांक 20 सकाळी 10:30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऑडिटोरियम येथे पालकांसाठी व शिक्षकांसाठी परिसंवाद विषय: लहान मुलांची मानसिक व भावनिक आरोग्य (parent as emotional coach). या विषयातील तज्ञ child and adolescent psychiatrist स्पीकर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर शिल्पा गायकेवारी मॅडम डॉक्टर गिरीजा महाले मॅडम (पुणे).. संगीता ऋषीपाठक.. स्कूल कॉन्सिलर…(पुणे) हे तज्ञ मार्गदर्शन करतील यामध्ये एक तासाचे मार्गदर्शन व एक तासाचे प्रश्न उत्तरे राहणार आहेत.
आधुनिक उपचार पद्धतीची मिळणार माहिती
बालरोग क्षेत्रातील अत्याधुनिक उपचार पध्दती, संशोधन जास्तीत जास्त डॉक्टर आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांपर्यंत पोहचवण्याचा या परिषदेमागील उद्देश आहे. मराठवाड्यात अशा प्रकारच्या परिषदा जास्तीत जास्त संख्येने होण्याची गरज आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील तज्ज्ञ परिषदेच्या निमित्ताने त्यांचे अनुभव, संशोधन मांडतील. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग नक्कीच होईल असा विश्वास डॉ शिवप्रसाद मुंदडा (Organizing Secretary) यांनी व्यक्त केला.
नोंदणी मिळतोय मोठा प्रतिसाद


परिषदेसाठी 600 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. 22 जानेवारी रोजी परिषदेचा समारोप होणार आहे. पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे डॉ. अशोक आरदवाड, डॉ. जितेन जैस्वाल, डॉ संदीपान साबदे, डॉ शिवप्रसाद मुंदडा, डॉ नितीन येळीकर, डॉ अर्चना कोंबडे यांची उपस्थिती होती. मार्पकॉन 2023 व CPS मुंबईचे अध्यक्ष डॉ. गिरीश के मैंदरकर हे वीडियो कॉन्फरन्सिंग द्वारे सदरील पत्रकार परिषदेला उपस्थित होते