राष्ट्रीय

चिंता वाढली; राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात

Coronavirus Alert : देशात एका वर्षानंतर पुन्हा एकदा करोना निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनसह जगातील अन्य देशात रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भारतातील राज्ये देखील अलर्ट झाली आहेत. या सोबतच महाराष्ट्रात ही आता कोरोनाचा नवा व्हेरीएंट आपले पाय पसरवून लागला आहे. आता महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

मुंबई मध्ये ४९ तर पुण्यात ४६ रुग्ण!

करोनाच्या नवीन व्हेरियंटने जगभरात थैमान घातलं आहे. याचीच धास्ती संपूर्ण जगाने घेतली असून करोनाच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईमध्ये करोना रुग्ण सक्रिय असल्याची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये ४९ रुग्ण सक्रिय आहेत तर पुण्यामध्ये ४६ करोना रुग्ण सक्रिय आहेत. महाराष्ट्रासह भारतासाठी हा चिंतेचा विषय झाला असून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आव्हान केले जात आहे.
करोना पुन्हा डोकं वर काढत असताना राज्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आणि सॅनिटायझर सोबत ठेवण्याचा आवाहन केलं जात आहे. ठिकठिकाणी मंदिर प्रशासन देखील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मास्क वापरण्याचं आव्हान करत आहे. विमानतळावर परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची करोना चाचणी केली जात आहे. त्याचसोबत बूस्टर डोस ज्या नागरिकांचा घ्यायचा राहिला आहे त्यांना देखील आपले डोस पूर्ण करण्याचं आव्हान करण्यात येत आहे.


चीनमध्ये करोना व्हायरसचा जन्म झाला आणि तो सगळीकडे पसरला. सगळ्या जगाला करोनामुळे लॉकडाऊनला समोरे जावे लागले होते. मात्र, आता करोनाचा नवीन व्हेरियंट पुन्हा धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबईमध्ये याचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून देशासाठी ही मोठी चिंतेची बाब मानली जात आहे. करोनाची आकडेवारी पाहता खबरदारी घेतली असतानाही पुन्हा एकदा देशात मास्क सक्ती किंवा अन्य काही काळजी घेण्याची गरज असेल क? ते येत्या काही दिवसांत आणि या आकडेवारीतून समोर येईल.

आरोग्य मंत्रालयाची बुधवारी बैठक

चीनसह अन्य अनेक देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली आहे. लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांचे रॅडम सॅपलिंग सुरू केले जाणार आहे. जर करोना पॉझिटिव्ह आले तर त्याचे नियमांचे पालन करावे लागेल. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. सध्या कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत पण बचावासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्या लोकांना आधीपासून काही आजार आहेत त्यांनी नियमांचे पालन करावे असे म्हटले आहे. आरोग्य मंत्रालय प्रत्येक आठवड्यात आढावा बैठक घेणार आहे.

घाबरण्याची नाही पण काळजी घेण्याची गरज


ओमिक्रॉनच्या नवीन प्रकाराला घाबरण्याची गरज नाही. पण काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण, एका व्यक्तीचा निष्काळजीपणा 18 लोकांसाठी अडचणीचा ठरू शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की Omicron BF.7 प्रकार एकाच वेळी 18 लोकांना प्रभावित करू शकतो आणि त्याची 5 लक्षणे कोणालाही मूर्ख बनवू शकतात.
कोरोना व्हायरस Omicron BF.7 उप-प्रकार काय आहे? TOI नुसार, नवीन प्रकार हे Omicron च्या BA.5 व्हेरियंटचे वंशज आहे, म्हणजेच ते त्यातून रूपांतरित केले गेले आहे. त्यात झपाट्याने पसरण्याची शक्ती आहे, कमी वेळात लक्षणे दिसून येतात.

एकाच वेळी १८ लोक होवू शकतात शिकार


TOI च्या माहितीनुसार Omicron BF.7 व्हेरियंटचे R मूल्य 10 ते 18.6 आहे. याचा अर्थ असा की या नवीन प्रकाराने संक्रमित एक व्यक्ती सुमारे 18-19 लोकांना संक्रमित करू शकते. जगातील अनेक देशांपाठोपाठ भारतातही याचे रुग्ण आढळून आले आहेत.

ही आहेत पाच लक्षणे


▪️वाहती सर्दी
▪️चोंदलेले नाक
▪️घसा खवखवणे
▪️कोरडा खोकला
▪️बलगमसह खोकला

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker