अहमदपुर-पाटोदा राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करा


आ. नमिता मुंदडा यांची मागणी
बीड जिल्ह्यातील पाटोदा ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी मार्फत चालू असलेले रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्ज्याचे व अतिशय संत गतीने होत असून सदरील कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुन ही कामात सुधारणा होत नसून या संपुर्ण कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केंद्रीय परीवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की
३० बळी; ८७९ कोटींचा खर्च!
बीड जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-D पाटोदा ते अहमदपूर या रस्त्याच्या कामाला कोरोना मुळे वाढऊन दिलेली मुदत संपली तरीही अंबाजोगाई, केज, नेकनूर शहरातील रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असून, सदर रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. सदर मार्गावर काम रखडल्यामुळे दोन वर्षात तब्बल ३० पेक्षा जास्त नागरिकांचे बळी गेले आहेत. जवळपास ८७९ कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता सध्या मृत्यू मार्ग बनला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे.


माझ्या केज विधानसभा मतदार संघातील अंबाजोगाई येथील सदर राष्ट्रीय महामार्गवरील यशवंतराव चव्हाण चौक ते लोखंडी सावरगाव दरम्यान चनई पाटी जवळ रस्ता एका साईडला दवून मधून भेगा पडल्या आहेत, तसेच अंबाजोगाई ते मांजरसुभा दरम्यान रस्त्यावर मोठ्याप्रमाणात भेगा पडल्या असून ठीकठिकाणी जंपिंग झाल्या असून प्लेन रस्ता राहिला नाही. त्यामुळे प्रवाशी त्रस्त आहेत.
सदर रस्त्याबाबत मी नागरिकांच्या व वाहनधारकांच्या तक्रारी एकूण घेऊन MSRDC च्या अधिकाऱ्यांच्या दोन वेळा बैठका घेऊन त्यांना कामाची गती वाढवण्यासाठी व कामाचा दर्जा राखण्यासाठी सूचना दिल्या परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. या बाबत मी आपणालाही दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी निवेदनाद्वारे कळवले आहे. याबाबत विविध वर्तमानपत्रातून सतत बातम्या प्रकाशित होत असुनही अद्याप वरील प्रकरणी संबंधित कंत्राटदाराकडून अथवा अधिका-यांकडुन कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे जनतेत प्रचंड प्रमाणात रोष आहे.
तरी आपणास विनंती कि, सदरील कामच्या गुणवत्तेची तत्काळ चौकशी करण्याबाबत आदेश देऊन अंबाजोगाई ते मांजरसुभा दरम्यान रस्त्याला पडलेल्या मोठमोठ्या भेगा व जम्पिंग तातडीने दुरुस्त करणेबाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी आ नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.