मंदिरांचे गावं

मुकुंदराज स्वामी, घोडदरी आणि जैत्रपाळ राजा…!

मराठीतील पाहीले कवी ज्यांना संपुर्ण महाराष्ट्र मराठीचे आद्दकवी ओळख म्हणून ओळखतो अशा स्वामी मुकुंदराज यांची आज जयंती. हा जयंती उत्सव अंबाजोगाई येथील त्यांच्या समाधीस्थळी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सलग आठ दिवस या परीसरात भजन किर्तन, नित्य ज्ञानेश्वरी पारायण, नित्यनेमाने पुजा विधी करण्यात येतात. याशिवाय समाधी स्थळी जत्रा ही भरते. आता या सर्व धार्मिक विधी आणि उत्साहात थोडा निरुत्साह दिसू लागला आहे. एकेकाळी यात्रेनिमित्त सतत आठ दिवस गजबजलेला हा परिसर आज यात्रेच्या दिवशी ही थोड्याशा गर्दीने बहरुन आल्यासारखा वाटत होता.
मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न…!

मुकुंदराज स्वामी,घोडदरी आणि जैत्रपाळ राजा

मुकुंदराज स्वामी यांनी संस्कृत भाषेतील वेदांतशास्त्र सामान्य जणांना सोप्या मराठी भाषेत सांगण्यासाठी त्यांनी “विवेकसिंधु ” आणि परमामृत” या ग्रंथांची रचना केली. यामुळेच मराठी भाषेचे कवी म्हणून त्यांना ओळखल्या जाते.

मुकुंदराजांसंबंधी “योगेश्वरी महात्म्य” या ग्रंथा मध्ये लिहीलेली कथा मजेशीर आहे. मुकुंदराज समाधी स्थळाच्या पुर्वेकडे साधारणतः अर्धा किमी अंतरावर जयवंती नदीचा प्रपात जेथे कोसळतो ती जागा घोडदरी किंवा अश्वदरी म्हणून ओळखली जाते. या घोडदरी जवळ एका डोंगराच्या उतारणीवरील मध्यभागी असलेल्या एका नैसर्गिक गुहेत ते योगसाधना करायचे. साधना करीत असतांना ऐके दिवशी योगसामर्थ्याने गुप्त होवून काशी क्षेत्री गेले. दरम्यान अंबाजोगाईत जैन धर्माचा कट्टर समर्थक जैत्रपाळ राजाने अंबाजोगाई च्या जयंत राजाचा वादविवादात पराभव करुन त्याला राजभ्रष्ट केले. या जैत्रपाळ राजाने आपल्याला योगसिध्दी प्राप्त व्हावी या इच्छेने विद्वान ब्राह्मण व साधुजणांच्या सल्ल्याने पाप नाशक व जयवंती नदीच्या संगमावर मोठा यद्न्य केला. यद्न्य काळात कोणी विघ्न आणू नये यासाठी जैत्रपाळ राजाने घोडदरी जवळ घोड्यांची पागा सज्ज ठेवली होती. त्यामुळेच या दरीला घोडदरी असे नाव पडले.

यद्न्याच्या सातव्या दिवशी यज्ञ कुंडातुन प्रकट झालेल्या बालका सिध्दीप्राप्तीसाठी साधुजणांची सेवा केल्याने तुला सिध्दी प्राप्ती होईल असे सांगितले व ते बालक क्षणार्धात आंतर्धान पावले. त्यानंतर साधुजणांच्या सेवेखातर राजाने अन्नछत्र सुरु केले. तेंव्हा शेकडोंच्या संख्येने भटके साधु दररोज मिष्टान्नावर ताव मारुन धष्टपुष्ट आणि आळशी बनले. त्यावेळी राजाने या साधुंना पुन्हा मला सिध्दी मिळवून द्दा असे सांगितले. तेंव्हा साधु राजाला म्हणाले, “तु दंवडी पिटून आम्हाला बोलावल्याने आम्ही तुझ्या अन्नछत्राचे लाभार्थी बनलो आहोत, आम्ही सिध्दीवैगेरे प्राप्त नाही आहोत व ती तुला देवूही शकत नाहीत.” हे ऐकून संतापलेल्या राजाने या सर्व साधुंना घोड्यासाठी आणलेली हरबरे भरडण्याच्या कामाला जुंपले व मला सिध्दी प्राप्त करुन द्दा नाही तर हरबरे भरडत बसा असे बजावले. जैत्रपाळ राजाच्या छळाने त्रासलेल्या साधूंनी अखेर योगेश्वरी देवी
कडे धावा घेतला. तेंव्हा योगेश्वरी देवीने मुकुंदराजांना साक्षात्कार घडवून येथील साधुंची सुटका करण्यास सांगितले. तेंव्हा काशी तीर्थ क्षेत्राहुन योगसामर्थ्याच्या जोरावर मुकुंदराज तात्काळ येथे आले. जत्रैपाळ राजाला याची खबर मिळताच त्यांनी मुकुंदराजांना निरोप पाठवला, “तु महान सिध्दयोगी असल्याने राजांना सिध्दी प्राप्त करुन दे, नाही तर तुझी ही इतर साधुप्रमाणेच गत केली जाईल.” राजांचा हा निरोप ऐकुण सात्विक संतापाने भडकलेल्या मुकुंदराजांनी पाळ राजाची भेट घेवून बजावले की, अगोदर तु या साधुंची तुझ्या सुटका कर, त्यांचे काम मी एकटा करतो.

त्यावर राजाने सेवेकरांकरवी एक भले मोठे जाते घास भरवून मुकुंदराजासमोर ठेवले असता मुकुंदराजाने आपल्या हातातील छडीचा स्पर्श त्या जात्याच्या खुंठ्याला करताच जाते आपोआप जारजोरात फीरु लागले. हा चमत्कार पहाताच जैत्रपाळ राजाने मुकुंदराजांच्या पायावर लोळण घेवून साधुजणांची सुटका केली. या नंतर मुकुंदराजाने “विवेकसिंधु ” हा ग्रंथ स्वतः जैत्रपाळ राजाला ऐकवला. त्यामुळे जैत्रपाळ राजाचे सिध्दीविषक मोहपटल दुर झाले. व मुकुंदराज आपल्या साधना गुहेत परतले.

योगेश्वरी महात्म्यातील या कथेशिवाय अशीही एक दंतकथा प्रचलित आहे की, जैत्रपाळाने देव दाखव, तळे खोद वा चने भरड म्हणत आरंभलेल्या साधुजणांची छळापासून सुटका करण्यासाठी मुकुंदराजांने त्याला “घोड्यावर बस, तुला देव दाखवतो” असे सांगून जैत्रपाळ राजाला घोड्यावर बसवले. व घोड्याला छडी मारताच जैत्रपाळाला उन्मनी अवस्था प्राप्त झाली. तो देहभान हरवला. राजाच्या त्या अवस्थेत मुकुंदराज पुढे निघाले. त्याच्या पाठोपाठ राजा दरीकडे निघाला. दरीकाठावर येताच मुकुंदराज अदृश्य झाले. आणि पाठोपाठ निघालेला जैत्रपाळ घोड्यासह त्या दरीत क्षणार्धात दिसेनासा झाला. आणि साधुलोकांची त्याच्या छळापासुन सुटका झाली. यावरुन त्या जयवंती नदी कोसळणाऱ्या दरीला घोडदरी हे नांव प्राप्त झाले. अशीही एक दंतकथा सांगितली जाते.

मुकुंदराजांच्या समाधीस्थळी आजाण वृक्ष आहे. आजाण वृक्ष संत ज्ञानेश्वरांच्या चिरंजीवी समाधी स्थळी (आळंदी) येथे ही आहे. आजाण वृक्ष असलेली महाराष्ट्रातील ही दोन पवित्र समाधीस्थळे आहेत. महाराष्टात अन्यत्र कठेही असा सदाहारीत आजाणवृक्ष
असल्याचे न्यात नाही. ज्ञानेश्वर मुकुंदराजांच्या भेटीला अंबाजोगाईत
आले असल्याचीही नोंद आहे.

@
सुदर्शन रापतवार, अंबाजोगाई ७२१८३०९३ ३३

sudarshan rapatwar @gmail.com

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker