मंदिरांचे गावं
ओंकार रापतवार यांनी संगीतबद्ध केलेले योगेश्वरी देवीचे भक्तीगीत रीलिज


अंबाजोगाई – मार्गशीर्ष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या ‘दंतासुर मर्दिनी कुमारी अंबाजोगाई’ या भक्तिगीताचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. अंबाजोगाईच्या तरुणांनी तयार केलेले हे भक्तीगीत अत्यंत श्रवणीय असून अल्पावधीतच चांगलेच व्हायरल झाले आहे. येथील ‘बॉम स्टुडीओ’ संचालक तथा संगीतकार ओंकार रापतवार यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत नंदीनी गायकवाड यांनी गायले आहे. तर, या गीताचे चित्रीकरण प्रसिद्ध छायाचित्रकार अक्षय चव्हाण यांनी केले आहे.
श्री योगेश्वरी देवीचे भक्तीगीत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –