महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही न पहायला मिळणारी सकारात्मकता अंबाजोगाईत पहायला मिळाली; मंजुषा मिसकर


अंबाजोगाई मध्ये काम करत असताना या माती मधील सकारात्मकता मला पहावयास मिळाली जी की महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही पहायला मिळणार नाही. मी इथे ज्या गोष्टी शिकल्या त्या कदापिही विसरू शकत नाही प्रशासकीय काम करताना अंबाजोगाई करांनी एक दिशा मला दिली असे उदगार अंबाजोगाई येथुन बदलून जात असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी सौ मंजुषा मिसकर यांनी काढले.
आम्ही अंबाजोगाईकर या ग्रुप च्या वतीने तालमार्तंड प्रकाश बोरंगावकर यांच्या पुढाकाराने अप्पर जिल्हाधिकारी सौ मंजुषा मिसकर यांच्या कार्य गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्य सत्काराला मंजुषा मिसकर या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा तर प्रमुख अतिथी म्हणुन अनिकेत भेय्या लोहिया, प्रसाद दादा चिक्षे, पत्रकार दत्तात्रय अंबेकर, सुदर्शन रापतवार, डॉ राजेश इंगोले, डॉ निशिकांत पाचेगावकर प्रकाश बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


या वेळी बोलताना सौ मंजुषा मिसकर म्हणाल्या की माझ्या नौकरीची सुरवात नागपूरला झाली. महसूल अधिकारी होणं हे कित्येक जन्माचं पुण्य आसुन त्यासाठी काम करताना कर्मचाऱ्यांना मनातूनच कामाची आवड असावी लागते. बीड जिल्ह्या मध्ये वाईट परिस्थिती पहावयास मिळाली. केवळ महसूल नव्हे तर सर्वच विभागात 80 टक्के कर्मचार्याना प्रशासकीय पत्र सुद्धा लिहायला जमत नाही हे वास्तव असुन
काम करण्या साठी जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. त्याच उद्देशाने अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील 4 हॉल प्रशिक्षण सेंटर सुरू करण्याचा माझा प्रयत्न होता. त्या साठी आ नमिता ताई मुंदडा यांनी निधीची तरतुद केली तर निश्चितच हे काम लवकरात लवकर मार्गी लागेल.
खऱ्या अर्थाने अप्पर जिल्हाधिकारी हे पद बिन दाताचा वाघ म्हणावं लागेल, कारण या पदाला निर्णय घेण्याचे कुठलेही अधिकार नाहीत आणि अधिकार असल्या शिवाय कार्यालय सुधारू शकत नाही.
मी अप्पर जिल्हाधिकारी पदांवर कार्य करताना आता पर्यंत सामान्य माणसा साठी काम केलं. इथे काम करताना अधिकाधिक जुनी प्रकरणे निकाली काढली. देवस्थान इनामी जमीन प्रकरणात रात्रंदिवस जागुन 1 महिना 100 पानांचा रोपोर्ट बनवला, चौकशी ज्या केल्या त्या निःपक्षपाती पणे केल्या.


काम करताना निर्बंध होते तरीही सचोटीने काम करण्याचा प्रयत्न केला. व यातच काम करताना समाधान मिळालं. माझ्या कौतुकाची मी कधी अपेक्षा केली नाही. मात्र अंबाजोगाई मध्ये काम करताना या माती मधील सकारात्मकता महाराष्ट्रात अन्यत्र
कुठेही पहायला मिळणार नाही. मी
इथे ज्या गोष्टी शिकल्या त्या कदापिही विसरू शकत नाही. एक दिशा मला अंबाजोगाईने दिली.
अंबाजोगाईच निसर्ग सौंदर्य पाहता या ठिकाणी पर्यटनाच्या उद्देशाने विकास केला जाऊ शकतो व या कामी नंदकिशोर मुंदडा यांनी पुढाकार घ्यायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.
या वेळी बोलताना जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा म्हणाले की, प्रत्येक
अधिकाऱ्यांनी ज्यांना वाली नाही त्यांच्या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे, अप्पर जिल्हाधिकारी यांनी महसूल प्रशासनात आपला वर्चस्व निर्माण केले पाहिजे, अधिकाऱ्यांनी सामान्य मानस केंद्र बिंदु समजून काम करायला हवं, निसर्ग हिरवा रहावं असं ज्याला वाटत त्याच मन ही हिरवं असत म्हणुन मिसकर मॅडम यांनी कार्यालयच नव्हे तर हा परिसर हिरवा करण्याचा प्रयत्न केला. आपण लोकांसाठी काय केलं याच्या आठवणी महत्वाच्या आहेत. आपण इथे जे उभं केलं आहे ते पाहण्यासाठी कुठंही गेलात तरी आपल्याला इथे यावं वाटेल.
अधिकाऱ्यांनी न्याय देणं होत नसेल तर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायला हवे. कौतुकाची भूक प्रत्येकाला असते. आपण कुठंही गेलात तरी अंबाजोगाई कर आपणास विसरणार नाहीत हे मात्र निश्चित आहे.


या वेळी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगता मध्ये सौ मंजुषा मिसकर यांच्या कार्यावर प्रकाश झोत टाकून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी नायब तहसीलदार गणेश सरोदे, गायकवाड साहेब, दगडू दादा लोमटे, सुहास मोहिते,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन प्रकाश बोरगावकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात बळीराम उपाडे यांच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद गायकवाड सचिन अंजन गायकवाड नाना अन्वर शेख संतोष राठोड नितीन जोगदंड कमलाकर जोगदंड कचरू नाना जगताप बळीराम उपाडे सुनील कांबळे यांनी परिश्रम घेतले.