विद्यार्थ्यांनी संस्कार व जीवनमुल्यांचा अंगीकार करावा; प्राचार्य डॉ. ठोंबरे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221126_182556.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221126_182556.jpg)
कृषि महाविद्यालय लातूर येथे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक वर्ष २०२२-२३मधील नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी कृषि पदवी शिक्षणाची ओळख आणि प्राध्यापक, विद्यार्थी व पालक सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या अभिमुखता कार्यक्रमात नूतन शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना बी एस्सी ( मानद) कृषि पदवी अंतर्गत कार्यक्रम, विषयनिहाय मूल्यमापन, महाविद्यालयातील उपलब्ध सोयी- सुविधा, विविध कृषि विषयक विभागांची ओळख व कार्यपद्धती, कृषि शिक्षणातील उच्चशिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या संधी याबाबत माहिती, महाविद्यालयातील उच्चविद्या विभूषित प्राध्यापक व कर्मचारी यांचा परिचय आणि विद्यार्थी,पालक व प्राध्यापक यांचा सूसंवाद घडवून आणला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे हे होते, कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विलासराव देशमुख कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जगदीश जहागीरदार होते तर डॉ. विश्वनाथ कांबळे, डॉ. भागवत इंदुलकर, डॉ. ज्योती देशमुख व डॉ. विठोबा मुळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221126_182544.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221126_182544.jpg)
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकता, बंधुभाव, सोहार्दता तसेच आपापसातील आपुलकी, जिव्हाळा व सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी या दृष्टिकोनातून महाविद्यालयातून अभिमुखता कार्यक्रमासारखे उपक्रम आवश्यक असतात.कृषिच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी हा केंद्रस्थानी मानून कृषि विषयक ज्ञान व तंत्रज्ञान अवगत करून त्याचा शेतकऱ्यांसाठी पुरेपूर उपयोग केला पाहिजे तसेच राष्ट्र व समाजाप्रती सेवाभाव वृद्धिंगत करून देशाच्या प्रगतीत योगदान दिले पाहिजे. आपल्या शैक्षणिक काळामध्ये जीवनविषयक मूल्य, संस्कार व आत्मविश्वास वृद्धिंगत करून शिक्षण, संशोधन व विस्तार कार्य या त्रिसूत्रीचा पुरस्कार करावा तसेच उद्योजक निर्माण होण्यासाठी नियमित बौद्धिक व प्रात्यक्षिक अभ्यासक्रम परिपूर्ण करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. जगदीश जागीरदार यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व तसेच कर्तव्य व जबाबदाऱ्या यांचेही महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी शिक्षण विभागाचे डॉ. विनोद शिंदे, शिष्यवृत्ती विभागाचे डॉ. विलास टाकणखार, वस्तीगृह व क्रीडा विभागाचे डॉ. संघर्ष शृंगारे जिमखाना विभागाच्या डॉ.ज्योती देशमुख तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिस कांबळे यांनी संबंधित विभागाचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात श्रीमती अनिता गडगडे, श्रीमती संजीवनी फपाळ, व डॉ. आनंद भरोसे या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक प्राध्यापक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विठोबा मुळेकर यांनी मांडले, सूत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे यांनी केले तर आभार डॉ. प्रभाकर अडसूळ यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पी एन करंजीकर, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. अनंत शिंदे, डॉ.संतोष कांबळे, डॉ. राजेश शेळके, डॉ. नितीन तांबोळी, डॉ. सुनिता मगर, डॉ. मकरंद भोगावकर, डॉ. शिवशंकर पोले, डॉ. संतोष वाघमारे, श्रीमती माया भिकाने व श्रीमती मीना साठे यांनी परिश्रम घेतले.