भारतजोडो यात्रेतील पदयात्री कृष्णकुमार पांडे यांचे निधन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221108_205335.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221108_205335.jpg)
खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी झालेले कॉंग्रेस सेवादलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार पांडे यांचे आज पदयात्रेत सहभागी असतांनाच नांदेड जिल्ह्यात निधन झाले.
नागपुर येथील मुळ रहिवासी असलेले कृष्णकुमार पांडे हे कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. एक सामान्य कार्यकर्ता ते कॉंग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष असा कॉंग्रेस पक्षातील त्यांचा विलक्षण प्रवास होता. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असलेले कृष्णकुमार पांडे हे केवळ नागपुर शहरातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित होते. खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर अशा निघालेल्या पदयात्रेत एक सामान्य यात्री म्हणून कृष्णकुमार पांडे हे सहभागी झाले होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221108_205419.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221108_205419.jpg)
आज सकाळी पदयात्रेत सहभागी होण्यापुर्वी त्यांना -हदयविकाराचा त्रास सुरु झाला, त्यांना तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भारतजोडो पदयात्रेत दु:खाचे सावट पसरले. यानंतर कृष्णकुमार पांडे यांचे पार्थिव भारतजोडो रात्री कॅम्प मध्ये नेण्यात आले. यावेळी खा. राहुल गांधी यांच्या समवेतच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अमर राजुरकर यांच्या सह यात्रेत सहभागी झालेल्या अनेक मान्यवरांनी त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहिली. कृष्णकुमार पांडे यांचे पार्थिव त्यांच्या गावी पाठवण्यात येणार असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.