आधार मल्टीस्टेटला दीपस्तंभ पुरस्कार जाहीर; १९ सप्टेंबर ला होणार वितरण


आधार मल्टीस्टेटला दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला असून १९ सप्टेंबर रोजी गणपतीपुळे येथे राज्याचे सहकार मंत्री ना. अतुल सावे यांच्या हस्ते गणपतीपुळेला येथे वितरण होणार आहे.


आधार मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. (महाराष्ट्र आणि कर्नाटक ) या संस्थेची स्थापना दिनांक १० आक्टो 2012 रोजी माजलगाव येथे झाली. आज दशक पूर्ती मध्ये संस्थेने पदार्पण केलेले आहे. आधार मल्टीस्टेट केवळ तांत्रिक पद्धतीने कार्य न करता समाजाशी एक वेगळं नातं निर्माण करण्याच्या उद्देशाने सहकार,सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक आणि शेती इत्यादी क्षेत्रांमध्ये संस्थेने मोलाचे कार्य केलेले आहे. या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबईच्या वतीने दरवर्षी दिला जाणाराओ दीपस्तंभ पुरस्कार 2022 हा आधार मल्टीस्टेटला जाहीर झाला असून त्याचे वितरण दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी गणपतीपुळे येथील हॉटेल ग्रिनलीफ रिसॉर्ट मध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय ना अतुलजी सावे उद्योगमंत्री मा ना उदय सामंत, सहकार व कायदा तज्ञ विद्याधर आणास्कर, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक मा, सतीश जी मराठे ,सहकार भरतीचे उदय जोशी ,महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयते इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती आधरचे अध्यक्ष सुनील सौंदरमल यांनी दिली .