भारत जोडतो यात्रा; कोल्हापूर मधील १० हजार कार्यकर्ते घेणार सहभाग
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221105_203636.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221105_203636.jpg)
सतेज पाटील यांची माहिती
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांडेमध्ये येत आहे. कोल्हापूरमधून 10 हजार कार्यकर्ते या यात्रेसाठी रवाना होणार आहेत.
काश्मीर ते कन्याकुमारी देशभ्रमण करत असलेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांदेडमध्ये येत आहे. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून या यात्रेच्या समर्थनार्थ राज्यातील नव्हे, तर देशातील पहिला मेळावा कोल्हापूरमध्ये घेण्यात आला होता. कोल्हापूरमधून 10 हजार कार्यकर्ते या यात्रेसाठी रवाना होणार आहेत. दरम्यान, या यात्रेत कोल्हापुरी बाणा झळकणार आहे. सतेज पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221105_203735.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221105_203735.jpg)
सतेज पाटील माहिती देताना म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सहा काँग्रेसचे आमदार, 12 तालुकाध्यक्ष तसेच पदाधिकारी असतील या सर्वांना प्रदेश काँग्रेसकडून या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी हिंगोलीमध्ये आम्हाला वेळ दिली आहे. त्यामुळे काही लोक 10 तारखेला संध्याकाळी कोल्हापूरमधून निघतील, तर काही लोक 11 तारखेला सकाळी निघून मुक्कामासाठी हिंगोलीत पोहोचतील. 12 तारखेला सकाळी सहा वाजता कोल्हापूरचे एक वेगळेपण दाखवत सगळेजण यात्रेमध्ये सहभागी होऊन राहुल गांधी यांना पाठिंबा देणार आहेत. ते पुढे म्हणाले की, कोल्हापूरमधून येणारे सगळे लोक कोल्हापुरी फेटा बांधून त्या ठिकाणी जातील आणि ‘कोल्हापुरी बाणा’ हा या भारत जोडो यात्रेमध्ये निश्चितपणे आपल्याला दिसून येईल, असेही त्यांनी नमूद केले.