ठळक बातम्या

सुनील मुथा यांची एक्झिट…!

सुनील हा माझा बालपणापासुनचा मित्र. आमच बालपण एकाच विभागात गेलं. लहानपणी भौतिक सुविधांची कमी होती पण दोघं ही अगदी सुखी कुटुंबात जन्मलेले. त्यामुळे जीवन जगण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी फार आदळ आपट करण्याची गरज भासली नाही.
सुनील घ्या वडिलांचा मेडिकल स्टोअर्स चार व्यवसाय, शिवाय घरी लग्न कार्याला लागणारी भांडी ही किरायाने त्यांच्या घरी मिळत असतं. माझ्या घरी बहिणींच्या लग्नात मी अनेक वेळी त्यांच्याच घरातुन भांडी किरायाने आणायचो. पुढे आम्ही वयाने मोठे झाले. व्यवसायाच्या दिशा बदलल्या, सुनील वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागला, मी इतर क्षेत्रात करीअर चार शोध राहीलो. पण मित्रत्वाची जागा मात्र गेली पंचावन्न वर्षांपासून तीच आहे.
सुनील चा मोठा भाऊ दिलीप. त्याने व्यवसायाची दिशा बदलली, मेडिकल व्यवसायासोबत निर्मिती गीफ्ट आर्टिकल ऍण्ड जनरल स्टोअर्स नावाचं दुकान सुरु केलं. पुढे दिलीप अंबाजोगाई येथून पुणे येथे व्यवसायासाठी स्थायिक झाला. सुनील ने मेडिकलचा व्यवसाय करीत निर्मिती चा विस्तार केला.
जुन्या जागेवर दुकानाची भव्य इमारत उभी केली. राहण्यासाठी सहा महिन्यांपुर्वीच अलिशान घर ही बांधलं. आई-वडील, पत्नी आई दोन मुलांसह सुनील अतिशय चांगलं, सुखवस्तू आयुष्य जगत होता.


पंधरा दिवसांपुर्वी अचानक त्याला -हदयाचा तीव्र झटका आला. मित्रवर्य डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचेवर तातडीने उपचार करण्यात आले. तपासणी झाल्यानंतर लगेच दोन तासात त्यांच्या उजव्या रक्त वाहिणीत दोन स्ट्रेंन टाकुन -हदयाचा रक्त पुरवठा सुरळीत करण्यात आला. आठ दिवसांत लगेच पुणे येथे तपासणी करुन डाव्या रक्त वाहिनीत तीन स्ट्रेंथ टाकण्यात आल्या. ही सर्व प्रक्रिया व्यवस्थित पुर्ण करुन तो घरी ही आला. मस्त हसतमुख, काहीच न झाल्यासारखा. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य तेज हे नवी उर्जा देत होते. या आठ दिवसांच्या कालावधीत दोन वेळेस मोकळ्या गप्पा झाल्या. पुर्वीचाच उत्साह त्यांच्या बोलण्यातून येत होता. कालच रात्री मी, डॉ. सुरेश अरसुडे, प्रा. शांतिनाथ बनसोडे सर आणि प्रा. पंडीत कराड आम्ही चौघांनी त्यांच्या घरी जाऊन निवांत गप्पा मारल्या, मोकळी चर्चा झाली. सर्व काही उत्तम होतं.
आज सकाळी चार वाजता सुभाष बडेरा यांचा फोन आला, तातडीने हॉस्पिटल ला या. सुनील ला वर आणलं आहे. ऊठुन लगेच तयार होवून हॉस्पिटल गेलो, तोपर्यंत सर्व खेळ खल्लास! नंदकिशोर मुंदडा, धनराज सोळंकी आणि सामील सोबत चर्चा झाली. रात्री दोन नंतर सुनीलला पुन्हा अचानक त्रास सुरु झाला आणि वैद्यकीय उपचार मिळण्यापुर्वीच सुनील चा श्वास हरपला!
आजची पहाट ही माझ्या आयुष्यात न विसरुशकणारी पहाट ठरली. गेली दहा वर्षांपासून दररोज सायंकाळी पांच वाजता येणारा फोन आणि “सर.. कुठे आहेत, कुठं घ्यायचा चहा, का काही नाष्टा” हे शब्द आता यापुढे मला ऐकायला भेटणार नाहीत, मात्र सायंकाळी पाच वाजले की ते शब्द आलाराम लावल्याप्रमाणे कायम माझ्या मनात रुंजी घालत राहतील.
सुनील ची अशी भरल्या संसारातुन झालेली एक्झिट खुप वेदना देणारी आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर वृध्द आई वडिलांना, भाभी आणि दोन मुलांना देवो, ही ईश्वर चरणी प्रार्थना!
सुनील तु सोडून गेला असल्यास तरी कायम आमच्या सोबत असशील…मिस यू डियर !

🙏

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker