राष्ट्रीय

भारत जोडो यात्रेने ३८ दिवसात पुर्ण केला १००० किमी चा टप्पा; ७ नोव्हेंबर पासून १६ दिवस महाराष्ट्रात


भारत जोडो पदयात्रेत गेली ३८ दिवसांमध्ये अनेक महत्वपुर्ण घटना घडल्या. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांच्या प्रवास करीत ही पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रत येत आहे.
या पदयात्रेत कॉंग्रेस पक्षांसह भाजपाच्या विचारसरणीला विरोध दर्शवणा-या विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला लक्षणीय सहभाग नोंदवला. तर प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्या सहभागाने एक प्रकारचे चैतन्य या पदयात्रेत निर्माण केले.
“मिले कदम, जुडे वतन” ही भारत जोडो यात्रेची टॅग लाईन आहे. सलग १५० चालणारी ही पदयात्रा ३५७० किमी चे अंतर पार करत काश्मिर मध्ये जाणार आहे. यासाठी दररोज २० किमी अंतर चालत १२ राज्य आणि २ केंद्रशासीत प्रदेश पार करीत काश्मिर ला पोहोचणार आहे.

उदयपुर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात “भारत जोडो” यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भारत जोडो यात्रेचं नेतृत्व राहुल गांधी हे करणार हे निश्चित झालं. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कन्याकुमारी येथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील “भारतजोडो” या पदयात्रेचा शुभारंभ झाला. तब्बल १५० दिवस चालणाऱ्या या पदयात्रेला समारोप काश्मिर मध्ये होणार आहे. आज या पदयात्रेने ३८ व्या दिवशी १,००० किमी पाणी चालण्याचा टप्पा पुर्ण केला आहे. ही आनंदाची बाब आहे.


सध्या सर्वत्र पावूस सुरु आहे. आणि पावसात ही भारत जोडो यात्रा सुरु आहे. दोन आठवड्यांपूर्वी कर्नाटकातील म्हैसुर येथे मुसळधार पाऊस अंगावर झेलत राहुल गांधी यांनी केलेले भाषण खुप गाजलं. यावेळी कुठलाही अडथळा भारत जोडो यात्रेला त्यांचे लक्ष्य गाठण्यापासुन रोखू शकत नाही असे ठनकावून सांगितले होते.
३५७० किमी चालत जाणा-या या पदयात्रेत एकुण ३०० पदयात्री आहेत. या ३०० पदयात्रींची विभागणी तीन टप्प्यांत करण्यात आली आहे.
या पदयात्रेतील १०० लोक “भारत यात्री” म्हणून ओळखले जातात. हे १०० भारत यात्री पदयात्रेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालत जाणारे आहेत. यामध्ये राहुल गांधी यांचा समावेश आहे. दुसरे १०० यात्री हे “अतिथी यात्री” आहेत. ज्या राज्यातुन ही पदयात्रा जाणार नाही त्या राज्यातील हे अतिथी यात्री असतील. तर तिसरे १०० यात्री हे ज्या राज्यातुन ही पदयात्रा चालली आहे, त्या राज्यातील असतील.
या यात्रेच्या माध्यमातून भारतामध्ये फोफावणारी आर्थिक विषमता, सामाजिक धृवीकरण आणि राजकीय तणाव बाजुला सारुन भारत एकसंध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेस पक्षाकडुन सांगितले जाते.


मध्यंतरी कर्नाटकातील जक्कनहळी येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचाल्याचं दिसून आले. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत विविध ठिकाणी युवकांशी, नागरिकांशी, शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना दिसून आले आहेत. सोनिया गांधी देखील यात्रेत सहभागी झाल्यानंतर काही महिला कार्यकर्त्यांसोबत त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला.
आज शनिवारी या पदयात्रेचा ३७ वा दिवस आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेली पदयात्रा तामिळनाडू, केरळ आणि आता कर्नाटकात प्रवेश करुन ७ नोव्हेंबर ला महाराष्ट्रात येणार आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर ला नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथुन या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील विविध गावांत या पदयात्रेचा १६ दिवस मुक्काम असणार आहे. महाराष्ट्रात ३८३ किमी अंतर ही पदयात्रा चालणार आहे. भाजपाची विचारधारा मान्य नसणाऱ्या राजकीय पक्ष आणि संघटनांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी मध्यंतरी केले आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या भव्य पदयात्रेमुळे यापुर्वी भारतात निघालेल्या अनेक पदयात्रे ची चर्चा या निमित्ताने होते आहे. भारतातील पदयात्रेचा इतिहास पहाता २० आणि २१ शतकापुर्वीही येथे पदयात्रा काढल्या गेले असल्याचे संदर्भ इतिहास आढळून येतात. शंकराचार्यांच्या आधी गौतम बुद्धांनी तर नंतरच्या कालखंडात गुरु नानक आणि महात्मा गांधी यांनी अशा पदयात्रा काढल्याची नोंद आहे. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ साली आचार्य विनोबा भावे, १९८३ साली माजी पंतप्रधान चंद्रशेखर, २००३ साली वार एस आर रेड्डी, २०१३ साली दिग्विजयसिंह यांची नर्मदा यात्रा या पदयात्रांचा मुख्यत्वे उल्लेख करावा लागेल. या पदयात्रेपैकी गौतमबुद्ध, गुरु नानक, आचार्य विनोबा भावे यांच्या पदयात्रा या अराजकीय तर महात्मा गांधी, चंद्रशेखर, वार एस आर, चंद्राबाबु नायडु, दिग्विजयसिंह यांच्या पदयात्रा या राजकीय पदयात्रेपेक्षाही वेगळ्या असल्याचं राजकीय अभ्यासक सांगतात.



राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही पदयात्रा निश्चितच राजकीय स्वरुपाची पदयात्रा आहे. देशात निर्माण झालेलीआर्थिक विषमता, सामाजिक धृवीकरण आणि राजकीय तणाव बाजुला सारुन भारत एक संघ करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली असल्याचं कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात येत असलं तरी ही पदयात्रा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरुद्धचा असंतोष व्यक्त करण्यासाठी आणि कॉंग्रेसची प्रतिमा अधिक उजळून काढण्यासाठी आयोजित केली आहे हे स्पष्ट दिसते आहे. आगामी होणा-या लोकसभा निवडणुकीत या पदयात्रेचा परिणाम दिसून येईल आणि कॉंग्रेस पक्षाला किमान १०० जागा लोकसभा निवडणुकीत जिंकता येतील असा दावा कॉंग्रेस समर्थकांच्या वतीने करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारतजोडो ही पदयात्रा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काढण्यात आलेली सर्वात मोठी आणि सर्वात जास्त दिवस , जास्त अंतर चाललेली पदयात्रा ठरणार आहे. भारतातील १२ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील अनेक शहर पायी फिरल्यामुळे राहुल गांधी यांच्याशी या विभागातील सामान्य माणूस जोडला जावू शकेल. आणि असे झाले तर याचा परिणाम खरेच आगामी लोकसभा निवडणुकीत दिसेल का? या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी काही काळ थांबावे लागेल.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker