Uncategorizedमहाराष्ट्र

मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले! ओव्हरफ्लो होण्यासाठी फक्त ३ सेमी कमी; उजव्या कालव्यातून सोडणार पाणी!


बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २७२ गावांची तहान भागवणारे मांजरा धरण आज पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी फक्त ३ सेमी ऊंचीच्या पाण्याच्या थराची आवश्यकता आहे. येत्या काही तासात हे धरण पुर्ण क्षमतेने भरेल आणि मांजरा धरणात अतिरीक्त येणारे पाणी उजव्या कालव्यातून सोडण्यात येईल अशी माहिती मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणारे शाखा अभियंता सुरेश निकम यांनी दिली आहे.
मांजरा धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह सध्या कमी झाला असल्यामुळे धरण भरण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. गेली दोन दिवस धरण पुर्ण क्षमतेने भरेल व या धरणाचे दरवाजे उघडले जातील या क्षणाची वाट बीड लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील धरणाकाठच्या तालुक्यात राहणारी लोक पहात आहेत. धरणाचे दरवाजे उघडले की, या तीन जिल्ह्यांतील बरेच लोक धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडण्यात आल्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी धरणावर गर्दी करीत असतात.
गेली दोन दिवसांपासून मांजरा धरण भरेल व धरणाचे दरवाजे उघडतील ही आशा आता सध्यातरी मावळली असल्याचे दिसत आहे. मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता सायंकाळी पाच वाजता फक्त ३ सेमी उंचीच्या पाण्याची प्रतिक्षा आहे. धरणक्षेत्रावर या सर्व गोष्टींवर बारीक नजर ठेवून धरण पुर्ण क्षमतेने भरले की, नदीपात्रातुन येणाऱ्या पाण्याचा येवा लक्षात घेऊन तो बाहेर सोडण्यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज ठेवून शाखा अभियंता सुरज निकम हे धरण स्थळावर ठाण मांडून बसले आहेत. मांजरा धरणात नदी पात्रातुन येणाऱ्या पाण्याचा वेग लक्षात घेता धरण पुर्ण क्षमतेने भरले की उजव्या कालव्यातून अतिरीक्त येणारे पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. यासाठी निश्चित कितीवेळ लागेल हे सांगता येत नसले तरी रात्री आठ वाजेपर्यंत उजव्या कालव्यातून पाणी सोडावे लागेल अशी स्थिती सध्या आहे. मांजरा धरण क्षेत्रात जर अतिरीक्त पावूस झाला आणि नदीपात्रातुन धरतात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा येवा होवू लागला तर कदाचित धरणाचे दरवाजे उघडावे लागतील, मात्र आज तरी धरणाचे दरवाजे उघडावे लागण्यासाठी परिस्थिती नसल्याचे शाखा अभियंता सुरज निकम यांनी सांगितले.
मांजरा धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे असून या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्याची यंत्रणा सज्ज करुन ठेवण्यात आली आहे, मात्र कार्यालयाच्या आदेशानुसार सुरुवातीला उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे नदी काठावर असलेल्या गावातील वस्ती करुन राहणा-या लोकांना सावधानतेचा इशारा ही लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आला असल्याचे सुरज निकम यांनी सांगितले आहे.

▪️मांजरा धरणाची माहिती

मांजरा धरण मांजरा नदीवरील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धरण आहे. या धरणाचा प्रकल्पिय साठा क्षमता, एकूण साठा = 224.09 दलघमी (8 TMC), उपयुक्त साठा = 176.96 दलघमी, मृत साठा = 47.130 दलघमी, पूर्ण संचय पातळी = 642.37 मी.

▪️मांजरा धरणाचा उद्देश : सिंचन

▪️अडवलेल्या नद्या/प्रवाह : मांजरा
▪️स्थान गाव: धनेगाव,
तालुका: केज , जिल्हा: बीड
▪️सरासरी वार्षिक पाऊस
७०० मी.मी.
▪️बांधकाम सुरू
आ. केशवराव सोनवणे (१९६६) उद्‍घाटन दिनांक
१९८०-१९८४
▪️जलाशयाची माहिती
क्षमता ३७१.२७ दशलक्ष घनमीटर

▪️मांजरा धरणाचे पाणलोट क्षेत्र महासांगवी,पाटोदा,पांढरेवाडी,चौसाळा,पारगाव(वाशी),केज,नेकनूर,कळंब या ठिकाणी पाऊस पडल्यास मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते.

कृष्णा-नीरा-सीना-मांजरा नदीजोड प्रकल्पाद्वारे बोगद्यातून कृष्णा,नीरा नदी खोऱ्यातील पाणी मांजरा धरणात आणण्यासाठी काम सुरु आहे.

▪️बांधण्याचा प्रकार :
मातीचा भराव व दगडी बांधकाम
▪️उंची : 42.10 मी (सर्वोच्च)
▪️लांबी : ४२०३ मी
▪️दरवाजे :
१८, आकार १२×५ मीटर
▪️ प्रकार : S – आकार
▪️लांबी : २६० मी.
▪️सर्वोच्च विसर्ग :
६००० घनमीटर / सेकंद

▪️पाणीसाठा संपादन करा

ओलिता खालील क्षेत्र
क्षेत्रफळ : ४३.९२३ वर्ग कि.मी.
क्षमता : २५०.७० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १७३.३२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ४३४९.३० हेक्टर

▪️कालवा
डावा कालवा
लांबी : ९० कि.मी.
क्षमता : ८ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २३६९० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २१३२१ हेक्टर

उजवा कालवा
लांबी : ७८ कि.मी.
क्षमता : ८ घनमीटर / सेकंद

▪️धरणाचे वैशिष्ट्य :
लातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह, १७२ गावांना पाणीपुरवठा मांजरा धरणातून होतो. या धरणाची ओळख त्याच्या स्थानिक गावावरून “धनेगाव धरण” अशीही होते. हे धरण मुख्यतः दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात असल्यामुळे ते जास्त रिकामेच असते. धरणाच्या निर्मिती नंतर १४ सप्टेंबर २०१६ रोजी धनेगाव धरणात थेंबरही पाणी नव्हते. ही इतिहासात नोंद करणारी घटना ठरली होती. मात्र नंतर केवळ १० दिवसांत हे धरण पुर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहु लागले होते.

🙏

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker