मांजरा धरणाला भरतीचे वेध! सायंकाळ पर्यंत दरवाजे उघडण्याची शक्यता


फक्त १६ दलघमी पाणी साठा
पुर्णक्षमतेने भरण्यासाठी हवा
बीड-लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील १७२ गावांची तहान भागवणा-या मांजरा धरणात आज १४ आँक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत ९० टक्यांच्याही पुढे पाणी संचय झाला असुन धरणक्षेत्रात पाण्याचा ऐवा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आज धरण पुर्णक्षमतेने भरले जाण्याची आणि धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ प्रशासनावर येईल अशी आशा निर्माण झाली आहे.
यावर्षी जुन महिन्यापासूनच दमदार पावसास सुरुवात झाली होती, मात्र मध्यंतरी पावसाने आपला हात आखडता घेतला असल्यामुळे उभ्या शेतातील पीके हातची जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अत्यल्प व अनियमित पावसामुळे मांजरा धरण भरेल का नाही याबाबत ही शंका निर्माण होत होती. मात्र याच वेळेस मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत दमदार पावूस झाल्यामुळे मराठवाड्यातील सर्वच मोठी धरणे ओसांडुन वाहत होती.
मांजरा धरणाच्या वरच्या बाजुस नदीच्या उगमस्थानापासुन १४ बंधारे आणि लहानमोठे असे २६ तलाव निर्माण करण्यात आल्यामुळे अलिकडील कांही वर्षात मांजरा धरण भरण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाही परिस्थितीत “मांजरा” तग धरुन उभे राहण्याचा प्रयत्न करतेयच! अलिकडे पर्जन्यमानात झालेली कमी आणि मोठ्या पुढा-यांची पाणी ओढण्यासाठी निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा बीड-लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १७२ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या या गावातील माणसांची, जनावरांची, पक्षांची, पिकांची तहान भागवणा-या मांजरचा गळा घोटण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि या १७२ गावातील लोकप्रतिनिधी, छोटे-मोठे पुढारी, सामाजिक कार्यकर्ते हा सर्व प्रयत्न अतिशय सहजतेने पहात आहेत.
यासर्व अडचणींचा मुकाबला करीत मांजरा नदी आणि धरण आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासर्व अडथळ्यांच्या स्पर्धेमुळे आता मांजरा भरण्यास विलंब लागत आहे. आज १४ आँक्टोबर रोजी मांजरा धरणात ९० टक्यापेक्षा ही जास्त पाणी साठा जमा झाला आहे. सध्या बेडुक नक्षत्र सुरु आहे, या नक्षत्रात चांगला पावूस पडतो असे संकेत आहेत. शिवाय मध्यंतरी कमी दाबाचा निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे आपल्या भागात मोठ्या पावसाचा आपल्याला लाभ झाला आहे.


याशिवाय या विभागाला आणि मांजरा धरणाला नेहमी तारणारा परतीचा पावूस यावर्षीही मांजराच्या मदतीला धावून आला आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक परीणाम होवून आज मांजरा धरणाने ९० टक्क्याचा टप्पा ओलांडला आहे. मांजरा नदी पात्रातुन धरणात येणाऱ्या पाण्याचाही प्रचंड येवा आहे. काल आष्टी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि आज सकाळपासून या विभागात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे या पाण्याच्या येवा मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मांजरा धरणात प्रति सेकंदाला ११८.९८ घनमीटर पाण्याचा येवा आहे. हा वेग लक्षात घेता येत्या काही तासात मांजरा धरण भरल्याची व धरणाचे दरवाजे उघडल्याची गोड बातमी आपणास ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.


मांजरा धरणाची संपुर्ण पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दलघमी एवढी असून आज धरणात २०६.२४४ दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजे धरण पुर्णक्षमतेने भरण्यासाठी १८ दलघमी पाणी साठ्याची आवश्यकता आहे. आज मांजरा नदीचा प्रवाह लक्षात घेतला तर प्रति सेकंदास ११८.९८ घनमीटर एवढे पाणी धरणक्षेत्रात जमा होत आहे. धरणक्षेत्राच्या कँचमेंट एरीयात आणखी जोराचा पावूस सध्या सुरु आहे. या दमदार पावसाचे पाणी मांजराचे दरवाजे उघडण्यास भाग पाडणार आहे.
▪️आज दरवाजे उघडण्याची शक्यता
मांजरा धरणात नदीपात्रातुन येणाऱ्या पाण्याचा वेग लक्षात घेता आज सायंकाळ पर्यंत धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. नदी पात्रातुन येणाऱ्या पाण्याचा येवा लक्षात घेवून धरणाचे किती दरवाजे आणि किती उंचीपर्यंत उघडावे लागतील याचा अंदाज घेवून निर्णय घ्यावा लागतो. मांजरा धरणाच्या देखरेखीसाठी २४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे मात्र त्यापैकी अनेक जागा रीक्त आहेत. उपलब्ध स्टाफच्या सहकार्याने मांजरा धरणाच्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम रात्रंदिवस चोखपणे बजावण्याचा प्रयत्न करीत आहोत. मांजरा धरण भरण्याची शक्यता लक्षात घेऊन या. कार्यकारी अभियंता कार्यालयाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यापुर्वीच दिला आहे. हा लक्षात घेता शेतकऱ्यांनी नदीकाठचे वास्तव्य हलवून आपले स्वतःचे, पशुचे व शेतमालाचे नुकसान वाचवण्याचे प्रयत्न करावेत.
सुरज निकम,
शाखा अभियंता,
मांजरा धरण, धनेगाव.
माजरा प्रकल्प
दिनांक: १४ आँक्टोबर २०२२
१) प्रकल्पीय पूर्ण जलाशय पातळी (FRL) ६४२.३७ मी
२) प्रकल्पीय पूर्ण पाणी साठा (G S.) २०६.२२४/२२४.०९३ दलघमी
३) प्रकल्पीय उपयुक्त पाणी साठा (L.S.)
१५९.११३/१७६.९६३ दलघमी
४) प्रकल्पीय मृत साठा (D.S.) ४७.१३०/४७.१३० दलघमी
५) आजची पाणीपातळी (W.L.) ६४१.९८/६४२.३७ मी ( सकाळी ६:००वाजता)
६) आजचा एकूण पाणीसाठा (G S.) १७१.१९३/२२४.०९३ दलघमी
७) आजचा उपयुक्त पाणीसाठा (L.D.)
८९.९१ टक्के
८) धरणात येणारा पाण्याचा प्रवाह
(T. Inflow) ११८.९८/१६६.४४२ घनमिटर प्रती सेकंद .
🙏