डॉ. संदीप निळेकर यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती


स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. संदीप निळेकर यांची प्राध्यापक पदी नियुक्ती
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप निळेकर यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील प्राध्यापक पदांच्या रीक्त जागांसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये डॉ. संदीप निळेकर, डॉ. सुनिता टोणपे, डॉ. स्वाती भिसे, डॉ. अनिल मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. संदीप निळेकर हे मेरीट लिस्ट नुसार प्रथम क्रमांकावर आहेत. सदरील नियुक्तीचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे व सर्व प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.