महाराष्ट्र

देशाच सामाजिक आणि शैक्षणिक आरोग्य सुधारण्यासाठी अजुनही खुप कामाची आवश्यकता; प्रा. हरि नरके

देशाच सामाजिक आणि शैक्षणिक आरोग्य सुधारण्यासाठी अजुधही खुप कामाची आवश्यकता आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले प्रकाशन मंडळाचे सचीव प्रा. हरि नरके यांनी अंबाजोगाई येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. “देशाच सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक आरोग्य ” या विषयावरील परिसंवादात डॉ. हरि नरके येथील श्री सरस्वती पब्लिक स्कूल आणि कै. दादाराव कराड विद्यालयात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. रतनलाल सोनाच्या संचालक राजेश कराड हे उपस्थित होते.

  आपल्या विस्तारीत भाषणाच्या सुरुवातीलाच प्रा. हरि नरके यांनी 

आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना   भारताला स्वातंत्र्य  मिळवून देण्यापापासून आज पर्यंत आज पर्यंतच्या प्रगतीचे सिंहावलोकन करतांना भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचा गौरव पुर्ण उल्लेख केला. मात्र असे असले तरी ही देशाचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक आरोग्य फार ठणठणीत आहे असे मात्र नाही असे सांगत देशात आजही प्रचंड दारीद्रय ,शैक्षणिक असमतोल आणि सामाजिक विषमता असल्याचे सांगितले. 

    भारताला स्वातंत्र्य मिळवण्या पासुनच्या प्रारंभीच्या काळापासून

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, पं. जवाहरलाल नेहरु, लाल बहादूर शास्त्री, लैकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सह अनेक मान्यवरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केलेल्या उल्लेखनीय किमामुळे भारत गौरवपूर्ण कामगिरी करु शकला ही गोष्ट नजरेआड करता येणारी नसल्याचे ही त्यांनी सांगितले. मात्र या कामात असलेल्या काही उणीवा दुर करुन  देशाच सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून काही सूधारणा केल्या आणि त्याच सुधारणांचा आधार घेत आज या क्षेत्रात काम सूरु आहे.

     अशा परिस्थितीत आजचं सामाजिक आणि शैक्षणिक आरोग्य तपासत असतांना सर्व काही आलबेल आहे, या क्षेत्रातील सर्व काम संपले असे काही नाही. अजुनही या क्षेत्रात खुप काम करण्यास वाव आहे. जात लिंग भाव, स्री पुरुष समानता हे प्रश्न तर आहेतच या शिवाय केंद्र शासनाने अलिकडील जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात आजही १० लाख मुले भीक मागुन जगताहेत , १५ लाख लोक कचरा वेचून आपली उपजीविका भागवत आहेत, देशातील २३ टक्के लोकांना रहायला घरटी, झोपडे किंवा साधा निवारा नाही, मुंबई, पुणे, कोलकता, मद्रास या सारख्या महानगरात राहणा-या ६५ लाख लोकांच्या घरात अजूनही अंधार आहे, देशातील १७ टक्के लोक आजही गटाराच्या शेजारी राहतात ही वस्तुस्थिती आहे. 

आपण या सभागृहात असलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि आपण यांच्यापेक्षा खुप समाधानी आहोत. मात्र कधीतरी मुलभूत साधन सुविधेपासुन आज ही वंचित असलेल्या या लोकांची आठवण आपल्याला ठेवावी लागेल. या लोकांना जमेल तशी मदत करावी लागेल. यांचे भान ठेवावे लागेल.

देशात असलेली ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्यासारखे मोजके लोक प्रयत्न करताहेत ही विशेष कौतुकाची बाब असल्याचे सांगत त्यांनी कराड परिवाराच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

      या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक प्रा. रतनलाल सोनाग्रा यांनी भारतीय स्वातंत्र्या पासुन आज पर्यंतच्या सामाजिक आणि राजकीय प्रगतीचा चढता आलेख सांगितला. स्वातंत्र्य मिळवून आज ७५ वर्षे झाली तरी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती समाधानकारक नसली तरी खराब निश्चितच नाही असे सांगत या दोन्ही विषयांत खुप चांगले काम करण्याच्या संधी युवकांपुढे आहेत असे मत व्यक्त केले.

     या कार्यक्रमात संचालक राजेश कराड यांनी डॉ. हरि नरके आणि प्रा. रतनलाल सोनाग्रा यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरवाने उल्लेख करीत पुढील तीन चार महिन्यांच्या कालावधीत शहरातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरणारा दोन दिवसांचा परीसंवाद डॉ. हरि नरके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला. 

       श्री सरस्वती पब्लिक स्कूल घ्या प्रयाग आक्का कराड सभागृहात आयोजित या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता पाटील,  भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी, कमलाकर कोपले, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. डी. जी. धाकडे, प्रा. पंडीत कराड, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, बाबुराव मस्के, राजेंद्र कुलकर्णी यांच्या सह सरस्वती पब्लिक स्कूल, कै. दादाराव कराड विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker