बीडच्या व्यंगचित्रकाराने कलावंतासाठी स्वत:च्या जागेत दोन लाख रुपये खर्च करुन साकरली आर्ट गॅलरी
A cartoonist from Beed set up an art gallery for the artist at a cost of Rs 2 lakh in his own premises


बीड जिल्ह्यातील कलावतांची संख्या अधिक आहे. परंतु त्यांना स्वत:च्या विविध कलेलेचे प्रदर्शन करण्यासाठी माेफत हाॅल मिळत नाही. खर्च पलवत नाही यासह अनेक गैरसाेयींचा सामना करावा लागताे. कलावंतांची ही गरज ओळखून ती दुर व्हावी म्हणून त्यांना स्वत:च्या जागेत दोन लाख रुपये खर्च करुन व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी आर्ट गॅलरी उभारली आहे. जिल्हाभरातील चित्रकार, व्यंगचित्रकार, मुर्तीकारांसाठी ही आर्ट गॅलरी माेफत उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
बीड शहरामधील आयुर्मंगल निवासी मुकबधीर विद्यालयामध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची २६ वर्षे सेवा झाली आहे. त्यांनी बीड शहरात २०१३ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड व लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाव नाेंदवून व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी बीड जिल्ह्याचे नाव जागतीक पातळीवर गाजवले आहे. २०१८ मध्ये ३६ दिवस ३६ गावात प्रदर्शन आणि २०२२ मध्ये आर्ट गॅलरीची निर्मती या तीन वर्षामध्ये पहिले दाेन वर्षात प्रत्येकी तीन लाख रुपये व २०२२ मध्ये दाेन लाख रुपये असे वैयक्तीक कर्ज घेऊन त्यांनी स्वत:ची कलेला जगापर्यंत पाेहचवण्याचा प्रयत्न केला. दाेनही कर्ज हे फेडण्यासाठी त्यांना पाच-पाच वर्षांचा कालावधी लागला. २०२२ मध्ये पुन्हा त्यांनी दाेन लाख रुपये वैयक्तीक कर्ज घतले. जिल्ह्यातील कलावंतासाठी आनंदवाडी शिवारामध्ये स्वत:च्या जागेत आर्ट गॅलरी उभारली आहे. जिल्ह्यातील कलावंतांना माेफत सर्व व्यवस्था उपलब्ध व्हावी यातून त्यांच्या राेजगाराला चालना मिळावी हा यामगील उद्देश असल्याचे व्यंगचित्रकार पालीमकर यांनी सांगितले.
कर्ज घेऊन केले वर्ल्ड रेकाॅर्ड
२०१३ मध्ये स्त्रीभ्रृणहत्या या विषयावर सलग २२ तासामध्ये एक हजार ४०० व्यंगचित्र काढून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड तसेच लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये नाेंद केली. यासाठी तीन लाख रुपयांचे वैयक्तीक कर्ज घेतले त्याची पाच वर्षे परतफेड केली. पुन्हा २०१८ मध्ये मराठवाड्यातील ३६ गावांमध्ये ३६ दिवस स्वच्छ भारत अभियान या विषयावर प्रदर्शन भरवले. यासाठी तीन लाख रुपयांचे वैयक्तीक कर्ज घेतले त्याची पाच वर्षे परतफेड केली.
अशा प्रकारची आहे आर्ट गॅलरी
आनंदवाडी शिवार देवकते वाडा मागे आर्ट गॅलरी आहे. यामध्ये २० बाय १४ चा माेठा हाॅल आहे. आर्ट गॅलरीत डिसप्ले बाेर्ड जाे ४ बाय ४५ फुट लांबीचा आहे. पेंटींग अडकवण्यासाठी ३५ हँगरची व्यवस्था तर मुर्तीकारांसाठी २ बाय ७ फुट लांबीचे बारा टेबल व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. आर्ट गॅलरीचा वेळ सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली राहणार आहे. या आर्ट गॅलरीचे उद्घाटन शिरूर कासार येथील पद्मश्री पुरस्कार प्राप्त गोपालक शब्बीर मामू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
व्यंगचित्रकार सुहास पालीमकर संपर्क क्रमांक: 9158042371
सजीव-जाणीव-रचना
रवी उबाळे