निलंगा तालुक्यातील ९ रस्त्यांसाठी ५४ कोटी तर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी १४.४९ कोटींचा निधी
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/निलंगा-.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/निलंगा-.png)
लातुर / निलंगा विधानसभा मतदासंघात दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ व्हावी आणि प्रवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा या करीता माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने प्रयत्नशील असतात. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मतदासंघातील रस्ते अधिक दर्जेदार व्हावेत याकरीता आ. निलंगेकरांचा कायमच पाठपुरावा असतो. या पाठपुराव्यातून निलंगा विधानसभा मतदारसंघातील ९ रस्त्यांसाठी ५४ कोटी तर देवणी येथे न्यायालयाची नुतन इमारत उभारण्याकरीता १४.४९ कोटी रुपयांच्या निधीस राज्य सरकारकडुन मंजुरी मिळालेली आहे. लवकरच या निधीतून सदरील कामांना सुरुवात होणार आहे.
निलंगा मतदारसंघातील रस्त्यांची सतत पडणा-या पावसामुळे दुरावस्था झालेली पाहण्यास मिळत होती. या दुरावस्थेमध्ये दळणवळणाची सुविधा नागरिकांना योग्य प्रकारे मिळत नव्हती तर अनेक प्रवाश्यांना रस्त्यांच्या दुरावस्थेमध्ये विविध समस्यांना तोंड दयावे लागत होते. मतदारसंघातील रस्ते अधिक दर्जेदार व्हावेत आणि प्रवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरीता माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने प्रयत्नशील असतात. केंद्र व राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करून रस्ते विकासासाठी वेगवेगळया माध्यमातून निधी खेचून आणत असतात. त्याअनुषंगानेच निलंगा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी आ. निलंगेकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतलेला आहे. मतदारसंघातील विविध ९ रस्त्यांसाठी ५४ कोटीरूपयांच्या निधीस मंजुरी मिळालेली आहे या माध्यमातून औराद – ममदापूर, मुगांव-निलंगा, निलंगा-अनसरवाडा, निलंगा-मदनसुरी, शेडोळ खरोसा, दादगी-भंगार चिचोली, निलंगा , अनसरवाडा, येरोळ- साकोळ व पांढरवाडी – दैठणा हे रस्ते आता दर्जेदार होणार आहेत.
त्याच बरोबर मतदारसंघ अंतर्गत असलेल्या देवणी तालुका येथे न्यायालयासाठी नुतन इमारत उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती. याकरीताही आ. निलंगेकर यांनी पाठपुरावा करून देवणीच्या नुतन न्यायालय इमारतीकरीता १४.९५ कोटी रूपये निधी मंजूर करून घेतलेला आहे. रस्ते विकास आणि न्यायालय इमारत उभारणी याकरीता एकुण ६८.९५ कोटी रूपयांच्या निधीस मंजुरी मिळालेली आहे. सदर कामासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतल्याबददल मतदारसंघातील जनतेच्या वतीने माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.