![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/bhagat-singh-koshari-in-ambajogai.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/bhagat-singh-koshari-in-ambajogai.png)
मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज १९ ऑगस्ट रोजी बीड जिल्हा दौ-यावर येत ते या दौऱ्यात अंबाजोगाई येथील ग्रामदेवता योगेश्वरी मातेचे दर्शन घेणार आहेत. अंबाजोगाई शहरात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे फक्त सव्वातीन तास वास्तव राहणार असून या सव्वातीन तासांच्या कालावधीत ते जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेडक्रॉस सोसायटी अधिका-यांची बैठक घेणार आहेत. बैठकी नंतरचा १:३० तास जेवणासाठी राखीव ठेवण्यात आला असून जेवणानंतर ते योगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन परळी कडे प्रयाण करणार आहेत.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध साठी देण्यात आलेल्या दौ-याप्रमाणे
- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे शुक्रवार, दि.१९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.१५ वाजता लातूर येथून अंबाजोगाई जि. बीडकडे प्रयाण.
- दुपारी १२:०० वाजता शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, ता. अंबाजोगाई येथे आगमन व जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेडक्रॉस सोसायटी यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीसाठी राखीव.
- दुपारी १:३० ते ३:०० पर्यंत भोजनासाठी राखीव. दुपारी ३:०० वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथून योगेश्वरी देवी मंदिराकडे प्रयाण.
- दुपारी ३:०५ वाजता योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई येथे दर्शनासाठी राखीव. दुपारी ३:१५ वाजता शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण.
- दुपारी ४:२५ वाजता परळी वैजनाथ मंदिर, परळी येथे आगमन व दर्शनासाठी राखीव.
- दुपारी ४:४५ वाजता परळी वैजनाथ मंदिर येथून शासकीय विश्रामगृह परळीकडे प्रयाण. दुपारी ४:४५ वाजता शासकीय विश्रामगृह परळी येथे आगमन राखीव व मुक्काम.
- शनिवार, दिनांक २० ऑगस्ट २०२२ सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह, परळी जिल्हा बीड येथून लातूरकडे प्रयाण.
पूर्ण नाव: भगतसिंग कोश्यारी
जन्मतारीख: 17 जून 1942 (वय 80)
जन्मस्थान: पालनादुरा, बागेश्वर (उत्तराखंड)
पक्षाचे नाव: भारतीय जनता पार्टी
शिक्षण: पदव्युत्तर व्यवसाय: पत्रकार सामाजिक कार्यकर्ते
वडिलांचे नाव: श्री गोपाल सिंग कोश्यारी
आईचे नाव: श्रीमती मोतिमा देवी