महाराष्ट्र

मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वजाचे परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण

देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभासह 5 सर्वात मोठे भारतीय ध्वज

परळी / माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेज वरील डोंगरावर राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ साकारले असून, याठिकाणी मराठवाड्यातील सर्वात उंच, तब्बल 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. या तिरंगा ध्वजाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व मानवंदना देऊन लोकार्पण करण्यात आले.

अत्यंत दिमाखदार अशा या सोहळ्यात 150 फूट तिरंगा ध्वजाचे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने ध्वजारोहन करण्यात आले. तदनंतर बीड पोलिसांच्या बँड पथकाने वाद्यांच्या गजरात राष्ट्रगीत गाऊन ध्वजवंदना संपन्न झाली. यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणांनी परिसर अक्षरशःदुमदुमला होता. परळी शहरातील अनेक ठिकाणी नागरिक आपल्या घराच्या छतावरून या सोहळ्याचे साक्षीदार झाल्याचे पाहायला मिळाले. व्यासपीठावर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.

दरम्यान सरकार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत असले तरी आम्ही मात्र काही महिने अगोदरच या विशाल तिरंगा ध्वज उभारणीचे व 15 ऑगस्ट च्या काळात लोकार्पण करण्याचे नियोजन केले होते. या ठिकाणी सुशोभीकरण, एल ई डी वॉल, स्क्रिन यासह अन्य कामे पूर्ण करून, परळीत येणाऱ्या प्रत्येकाला या स्थळाची भुरळ पडेल, असे काम केले जाईल, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. परळी मतदारसंघाचा विकासात्मक व राजकीय दर्जा वाढवून परळीचा नावलौकिक व दबदबा दिल्लीत आणि मुंबईत वाढावा यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमास माजी आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, रा. कॉ.चे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, महिला  आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. संगीताताई तुपसागर, महसूल, पोलीस आदी विभागाचे कर्मचारी, प्राध्यापक वृंद, यांसह पदाधिकारी, अधिकारी- कर्मचारी, एनसीसी चे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी व परळीतील नागरिक मोठ्या संख्येने व उत्साहात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. ध्वज फडकण्यासाठी इलेक्ट्रिक पद्धतीने १३ मिनिटे लागल्यानंतर अत्यंत डौलाने अतिविशाल तिरंगा फडकताना पाहून उत्साह संचारणारे वातावरण तयार झाले होते; त्यात भारतमातेच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी, तिरंगा धारक लहानगे विद्यार्थी, पोलिसांचे बँड पथक, वैद्यनाथ महाविद्यालयातील एनसीसी पथक आदी या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभासह 5 सर्वात मोठे भारतीय ध्वज

बेळगाव – 361 फूट

कर्नाटकातील बेळगाव हे अधिकृतपणे बेळगावी म्हणून ओळखले जाते, कोते केरे तलावासमोर भारताचा सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकवला जातो जो अटारीतील एकापेक्षा 1 फूट उंच आहे. प्रतिमा द हिंदू.

अटारी सीमा – 360 फूट

360 फूट खांबावर 120×80 फूट आकारमान असलेला राष्ट्रीय ध्वज हा भारताचा सर्वात उंच ध्वज आहे. अमृतसरमधील भारत पाक अटारी सीमेवर देशातील सर्वात उंच फ्लॅग पोस्टवरील सर्वात मोठ्या तिरंग्याचे उद्घाटन करण्यात आले.

भक्ती शक्ती ध्वज – 351 फूट पुणे

निगडीतील PCMC च्या भक्ती शक्ती उद्यानात भारताचा दुसरा सर्वात मोठा राष्ट्रध्वज 351 फूट उंच आहे. निगडी हे सर्वात उंच ध्वज खांब, अप्पू घर, भक्ती शक्ती पुतळा आणि श्री कृष्ण मंदिर यासारख्या प्रेक्षणीय स्थळांची यादी असलेले नियोजित शहर आहे.

गुवाहाटी ध्वज – 319.5 फूट

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त गुवाहाटी येथे भारताचा तिसरा सर्वोच्च राष्ट्रध्वज स्थापित करण्यात आला आहे. गुवाहाटीच्या गांधी मंडपातील ध्वज हा भारताचा तिसरा सर्वात उंच आणि ईशान्य भारतातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज आहे.

कोल्हापूर – 303 फूट

कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय ध्वजाचे उद्घाटन करण्यात आले. 1 मे 2017 रोजी कोल्हापूरच्या एसपी कार्यालयासमोरील 303 फूट उंच ध्वजाचे उद्घाटन झाले आणि ते देशातील सर्वात उंच ध्वजांपैकी एक आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker