

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या “हर घर तिरंगा” या उपक्रमाला प्रतिसाद स्वतः घरावरील ध्वजवंदनास भारतीय सैनृय दलातील निवृत्त सैनिकांना आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेल्यांना विशेष निमंत्रित करून समाजातील मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा अभिनव उपक्रम चंद्रशेखर वडमारे व त्यांच्या मॉर्निंग ग्रुप मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आला.
भारतीय अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज १३ ऑगस्ट रोजी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन वडमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक केशवराव भोसले, कॅप्टन पवार, त्रिदल माजी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन ग्यानदेव नारायण शेप, सचीव कमलाकर ज्ञानोबाराव मलवाड, संचालक भुंजगराव घनश्यामराव लाड, जनक गोविंदराव थोरात, शिवाजीराव मारूतीराव पठाडे, वैजनाथ रामचंद्र शेप, दशरथ महादेव गवळे, शेख गफार शेख महम्मद, बालाप्रसाद भगवानदासजी रांदड, सुनिता लक्ष्मणराव शिंदे, राजामती गुलाबराव वाघमारे, तुकाराम गोपाळराव कटारे, रमेश शंकरराव चाटे, रमेश पांडुरंग हाके यांच्या सह भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वज संचलनात सहभागी झालेल्या रचना किशोर परदेशी व ओंकार सत्येंदु रापतवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनिमागील संकल्पना सांगितली आणि ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी चंद्रशेखर वडमारे यांनी अनुमती देत सर्व व्यवस्था केली याचा आनंद व्यक्त केला.


या कार्यक्रमात कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या वतीने ऍड. आनंद जगतकर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, महादेव आदमाने यांनी माजी सैनिकांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमात माजी सैनिक सेवानिवृत्त कॅप्टन पवार, कमलाकर मलवाडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व माजी सैनिक आणि प्रजासत्ताक दिनाच्या पंथ संचलनात सहभागी झालेल्या रचना मोदी व ओंकार रापतवार यांचा गौरव करताना चंद्रशेखर लढणारे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमात ज्यांनी आपल्या आयुष्यातील अगदी महत्वाचा काळ खर्च केला, डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण केले अशा माजी सैनिकांचा गौरव या कार्यक्रमात करतांना आपल्याला विशेष आनंद होत आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास सर्व मान्यवरांनी आपला वेळ काढून सहभाग नोंदविल्याबद्दल हर्षवर्धन वडमारे यांनी सर्वांचे आभार मानले.


या अनोख्या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सुरेश आरसुडे, डॉ. सिध्देश्वर बिराजदार, सेवानिवृत्त उपप्राचार्य पंडीत कराड, सुभाष बाहेती, सुदर्शन रापतवार, शेख जमील, वैजनाथ अप्पा पाटील, ऍड. सुनील पन्हाळे, कान्हा भाऊ शर्मा, काचगुंडे, देवकर, तालुका क्रिडा अधिकारी दत्ता देवकते यांच्या सह इतरांनी परीश्रम घेतले.