अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस १ लाख रुपये दंड व सक्त मंजुरीची शिक्षा
गेल्या काही वर्षांत महिलांवरील आणि विशेषत: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबतचे कायदे अधिक कडक करण्यात आलेत.


गेल्या काही वर्षांत महिलांवरील आणि विशेषत: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबतचे कायदे अधिक कडक करण्यात आलेत. त्यानुसार, सोळा किंवा त्यापेक्षा कमी वर्षे वय असलेल्या मुलीवरील अत्याचार करणाऱ्याला कमीत कमी दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्याची कायदा दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्तीचा आधार घेत एका आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासीची शिक्षा सुनावली. कायदा दुरुस्तीनंतरची या प्रकारची अंबाजोगाई मधील ही शिक्षा असल्याचे सांगितले जात आहे. अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे साहेब यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या विशेष बा. लै. प्र. केस नं. २४/२०१७, महाराष्ट्र शासन वि. बाळासाहेब वळसे या प्रकरणातील आरोपीने अल्पवयीन मुलीस बळजबरीने पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केला. सदर प्रकरणात आरोपीस मा. न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड ठोठावला.
या प्रकरणातील आरोपी बाळासाहेब उर्फ खंडू धनंजय वळसे, रा. वळसे वस्ती, ता. केज, जि. बीड याने अल्पवयीन पिडीत मुलगी मेंहदी क्लासला जात असताना आरोपीने तिला बळजबरीने स्कॉर्पिओ मध्ये बसवत किडनॅप केलं, त्यात आवाज करू नये म्हणून तिचे तोंड दाबून बळजबरीने वाहनात बसवले आणि पळवून पूणे या ठिकाणी नेले येथे एक महिना सोबत ठेवून तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. वगैरे फिर्यादीवरून दि. २६/०४/२०१७ रोजी पो. ठा. केज येथे गु.र.नं. १९९/२०१७, कलम – ३६३, ३७६ (i), ३४४, ३४ भा.द.वी सहकलम ३, ४ बा. लैं. अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करून सदर प्रकरणाचा तपास पो. निरीक्षक आर. जी. गाडेवाड यांनी करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले..


सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. रामेश्वर एम. ढेले व त्यांना मार्गदर्शन वरीष्ठ सरकारी वकील ॲड. अशोक व्ही कुलकर्णी यांनी केले आणि ॲड.नितीन पुजदेकर यांनी मदत केली व तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. हे. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.