“हर घर तिरंगा” च्या घाई गडबडीमुळे अनेक ध्वज नियमबाह्य?
अधिका-यांची डोकेदुखी वाढणार!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/Flag-Code-1.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/Flag-Code-1.png)
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असताना या योजनेत खाजगी पुरवठा धारकांकडुन विक्रीसाठी ठेवण्यात आलेले अनेक राष्ट्रध्वज नियमबाह्य बनवण्यात आल्यामुळे अधिका-यांची डोकेदुखी वाढली आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ऑगस्ट पासून १५ ऑगस्ट पर्यंत आपल्या घराच्या उंच भागात तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले. या अहवालानुसार देशभरातील लोकांनी आपल्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत असून महानगर पालिका, नगर पालिका ते ग्राम पंचायत पातळीवर त्यासाठी नियोजन पुर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. या शिवाय देशभरातील नागरीकांना आपल्या घरावर तिरंगा लावण्यासाठी सहज उपलब्ध व्हावा म्हणून अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज विक्री साठी उपलब्ध करून देण्यासाठी जागोजागी तिरंगा ध्वज विक्री करण्यासाठीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. सदरील स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध असलेले अनेक राष्ट्रीय ध्वज नियमबाह्य पद्धतीने बनवण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.
राष्ट्रध्वज बनवतांना ध्वजआचार संहितेत सांगितलेल्या संपुर्ण निकषांची काटेकोर आणि तंतोतंत पालन करुनच राष्ट्रध्वज बनवण्यात यावेत असे या ध्वज आचारसंहितेत स्पष्ट म्हटले आहे. या ध्वज आचारसंहितेचे उल्लंघन करुन कोणी राष्ट्रध्वज बनवले तर त्या व्यक्तीवर शिक्षेची, दंडाची तरतुद ही या आचार संहीतेत करण्यात आली आहे. असे असतानाही “हर घर तिरंगा” मोहीमेत विक्री साठी ठेवण्यात आलेले अनेक राष्ट्रध्वज हे नियमबाह्य पद्धतीने बनवण्यात आल्याचे दिसून येत आहे.
या सर्व गोष्टींमुळे प्रशासकीय अधिकारी वेगळ्याच तणावात वावरत असल्याचे दिसून येत आहेत. एकीकडे घराघरावर ध्वज फडकवायचा आहे. परंतु तो शासकीय नियमानुसार असला पाहिजे. त्यामुळे घाई गडबडीत तयार केलेले नियमबाह्य ध्वज पुरवले जाऊ नयेत यासाठी प्रशासनाला डोळ्यात तेल घालून ध्वजांची तपासणी करावी लागत आहे. केंद्र शासनाने ‘हर घर तिरंगा’ची घोषणा गेल्या महिन्यात केल्यानंतर त्या दृष्टीने नियोजनासाठी बैठकांवर बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा पोलीस प्रमुख या चार महत्त्वाच्या प्रशासकीय यंत्रणांचे स्वतंत्र नियोजन सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांना याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने ध्वज मिळवताना आणि ते नियमबाह्य पद्धतीने बनवले गेले आहेत का? हे तपासताना प्रशासनाची दमछाक होत आहे.
राष्ट्रीय ध्वज…
भारताचा राष्ट्रीय ध्वज, ज्याला सामान्यतः तिरंगा म्हणतात, हा भगवा, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांचा क्षैतिज आयताकृती ध्वज आहे; तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे. २२ जुलै १९४७ रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला. भारतात तिरंगा हा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो. हा ध्वज पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित आहे.
कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा (हाताने कातलेले कापड जे महात्मा गांधींनी लोकप्रिय केले होते) किंवा रेशमाचा असावा. ध्वजाची निर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जातात. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाकडे आहे, जो प्रादेशिक गटांना त्याचे वाटप करतो. २००९ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होता. ध्वजाचा वापर हा भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हांशी संबंधित इतर कायद्यांद्वारे नियंत्रित केला जातो. मूळ संहितेमध्ये स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय दिवसांशिवाय नागरिकांकडून ध्वज वापरण्यास मनाई आहे. २००२ मध्ये नवीन जिंदाल या नागरिकाच्या अपीलावर सुनावणी करताना, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नागरिकांना ध्वज वापरण्याची परवानगी देण्यासाठी संहितेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरासाठी संहितेत सुधारणा केली. २००५ मध्ये कपड्यांच्या विशिष्ट प्रकारांवरील रुपांतरांसह काही अतिरिक्त वापरास अनुमती देण्यासाठी संहितेत पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली. ध्वज संहिता ही ध्वज फडकवण्याच्या प्रोटोकॉलला आणि इतर राष्ट्रीय व गैर-राष्ट्रीय ध्वजांच्या संयोगाने त्याचा वापर करण्यात नियंत्रित करते.
ध्वज संहिता :
काही दिवस शांतता असताना केंद्र राष्ट्रध्वजाच्या (भारतीय राष्ट्रीय ध्वज संहितेत बदल केला आहे. या ध्वज संहितेनुसार (भारताचा ध्वज संहिता) आता दिवस आणि रात्र दोन्ही बाजूने राष्ट्रध्वज तिरंगा फडकावता आहे . याशिवाय आता पॉलिस्टर आणि मशिनपासून बनवलेल्या ध्वजाचा वापर करता येतो. विशेष म्हणजे केंद्र सरकार ‘ आझादी का अमृत महोत्सवा’ (आझादी का अमृत महोत्सव) या मोहिमेचा प्रचार करत आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहीम केंद्र सरकार करणार आहे. सरकारच्या या मोहिमेवर उपचार हा निर्णय झाला आहे. तिरंगा फडकण्यास सूर्योदयापासून परवानगी होती.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व केंद्रीय मंत्री आणि विभागाच्या सचिवांना पत्रात म्हटले आहे की “भारतीय राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन, फडकवणे आणि वापर भारतीय ध्वज संहिता २००२ आणि राष्ट्रीय गौरव अपमान कायदा १९७१ (राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१) अंतर्गत भारतीय ध्वज संहिता २००२ मध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशात समाविष्ट करण्यात आले आहे. आता भारतीय ध्वज संहिता २००२ च्या भाग-२ च्या पॅरा २.२ चा खंड (११) आता खालीलप्रमाणे वाचला जाईल : ध्वज उघडण्यासाठी किंवा एखाद्या नागरिकांच्या निवासस्थानी प्रदर्शित केले जाईल, तों दिवस फडकता रात्री करू शकतो”.
याप्रमाणेच ध्वज संहिता बनवतांना आणखी एक तरतुदीत करण्यात आली आहे “राष्ट्रध्वज हाताने किंवा हाताने विणलेली मशीन तयार केली जाऊ शकतो. तसेच तो कापूस/पॉलिस्टर/लोर/रेशीम खादीपासून बनवलेला असू शकतो. तसेच मशीनने बनवलेले, पॉलिस्टर पासून बनवलेले राष्ट्रध्वज वापरण्यास परवानगी दिली.