राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला! ९ ऑगस्टला विस्तार; १० पासून अधिवेशन !!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/shidne-Fadanvis-1.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/shidne-Fadanvis-1.png)
गेली अनेक दिवसांपासून रखडलेला एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त अखेर सापडला असून उद्या सकाळी १२ वाजता १८ मंत्री शपथ घेतील असे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेवून जवळपास ३६ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी मंत्रीमंडळाचा शपथविधी होवू शकला नव्हता. मंत्री मंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्यामुळे राज्यातील सर्व कामकाज ठप्प झाले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता.
आता मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून उद्या ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शिंदे यांच्या मंत्रिमंडळात १८ जण शपथ घेतली असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे सरकाराच्या या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातून दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, राजेंद्र यड्राव्हकर, संजय राठोड यांची यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. यात अब्दुल सत्तार यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींचे नाव समोर आल्यानंतर त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार की, नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांच्यसह काही नवीन चेहऱ्यांना भाजप संधी देऊ शकते.
दरम्यान, राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) बुधवार, १० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. विधीमंडळ सचिवालयाकडून याबाबत परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाकरीता मंगळवार, ९ ऑगस्ट, १० रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरु राहील. तसेच मंगळवार ९ ऑगस्ट ते गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
स्वच्छ प्रतिमा असणाऱ्यांनाच मंत्रिमंडळात स्थान, कोणाकोणाच्या नावांची चर्चा? (Maharashtra Cabinet Expansion)
स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून ज्येष्ठ मंत्र्यांना संधी मिळू शकते. तर शिंदे गटाकडून सहा ते सात जणांचा शपथविधी होऊ शकतो.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून ज्येष्ठ मंत्र्यांना संधी मिळू शकते. तर शिंदे गटाकडून सहा ते सात जणांचा शपथविधी होऊ शकतो.