

नविन उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी, तर छोट्या उद्योजकांना आपल्या उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) या योजनेच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध आहे. या संधीच्या माध्यमातून अंबाजोगाई सारख्या ग्रामिण भागात नविन उद्योग उभारले जावेत. असे आवाहन अहमदाबाद येथील राष्ट्रीय विशेषज्ञ व उद्योग विषयक मार्गदर्शक निरंजन जुवा-जैन यांनी केले.
अंबाजोगाई येथील अद्यकवी मुकुंदराज सभागृहात “चला उद्योजक होऊ या” या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा उद्योग केंद्र बीड, भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय यांच्या वतीने करण्यात आले होते.
एमएसएमई साठी कोण पात्र आहे?
MSME म्हणजे काय यासाठी प्रतिमा परिणाम प्रोप्रायटरशिप, हिंदू अविभक्त कुटुंब, भागीदारी फर्म, एक व्यक्ती कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित कंपनी, उत्पादक कंपनी, व्यक्तींची कोणतीही संघटना, सहकारी संस्था किंवा इतर कोणतेही उपक्रम भारतात MSME नोंदणी मिळवू शकतात.
एमएसएमईचा सामान्य माणसांना उपयोग काय?
एमएसएमई मंत्रालयांतर्गत नोंदणीकृत एमएसएमईंना भारत सरकारद्वारे जारी केलेल्या परवाने आणि प्रमाणपत्रांच्या अर्जांवर प्राधान्य मिळते. नोंदणीकृत MSME ला पेटंट आणि उद्योग उभारणीच्या खर्चावर विविध सवलती आणि सवलती मिळतात. नोंदणीकृत MSME चे मालक त्यांच्या व्यवसायासाठी सहजपणे क्रेडिट मिळवू शकतात.
एमएसएमई कर्ज योजना काय आहे?
MSME कर्जे ही अनेक वित्तीय संस्थांद्वारे ऑफर केलेली असुरक्षित कर्जे आहेत ज्यामुळे उद्योजकांना विविध व्यवसाय-संबंधित खर्च पूर्ण करण्यात मदत होते. भारत सरकार आणि RBI नुसार, ही कर्जे काही विशिष्ट व्यावसायिक उपक्रमांसाठी आहेत.
यावेळी उपस्थितीतांशी संवाद साधताना निरंजन जुवा जैन म्हणाले की, नविन उद्योग उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. या योजनांच्या माध्यमातून उद्योग कसा सुरू करावा? उद्योगासाठी मिळणारे भांडवल कोठून उपलब्ध होते. उद्योगासाठीच्या सर्व सुविधा बाजार पेठ, मिळणारे कर्ज, त्यावरील सबसिडी, उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधा अशी सर्व सवस्तिर माहिती व विविध योजना त्यांनी उपस्थितांसमोर विषद केल्या. केंद्र शासनाच्या पीएमईसीपी, मुद्रा लोण योजना, सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग, एमएसएमई तर महिलांसाठी स्टँडप इंडिया ही योजना तर कृषी उत्पन्नावर आधारीत प्रक्रिया उद्योग खाद्य पदार्थ, प्रक्रिया उद्योग, वेअर हाऊस, नाबार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजना कोल्ड स्टोअरेज, ट्रानस्पोटेशन, ग्रीनहाऊस अशा विविध योजनांची माहिती त्यांनी उपस्थितांसमोर विषद केली. जाणून घ्या या बद्दल
यावेळी आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलताना हस्तीमलबंब म्हणाले की, अंबाजोगाई सारख्या शहरात उद्योग व्यवसाय नव्याने विस्तारीत व्हावेत यासाठी भारतीय जैन संघटनेने हा उपक्रम राबविला. आगामी काळात असे अनेक उपक्रम राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे निरिक्षक के.एस. पवार यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीचे माहिती दिली. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष मोईन शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय धनराज सोळंकी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचलन आनंद टाकळकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अधिकार मर्लेचा यांनी मानले. या कार्यक्रमास महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना निरंजन जुवा-जैन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हस्तीमल बंब उपस्थितीत होते. तर व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठनेते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश मुथा, सचिव अधिकार मर्लेचा, रोटरी क्लबचे अध्यक्ष मोईन शेख, सचिव भिमाशंकर शिंदे, प्रकल्प संचालक प्रदिप झरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे निरिक्षक के. एस. पवार,’ मिटकॉनचे जिल्हा समन्वयक के. एस. पवार उपस्थित होते.