गुळाचा खडा पाण्यात भिजवून खा आणि “या” व्याधी पासून मुक्त व्हा!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220801_164317.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220801_164317.jpg)
गुळाचा एक खडा रात्रभर पाण्यात ठेवून भिजवून खा आणि सांधेदुखी, कंबरदुखी, लठ्ठपणा, युरिक अॅसिड, कॅल्शियमची कमतरता या सगळ्या व्याधीपासुन दुर रहा.
मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आले आहे जो तुमच्या पोटाशी निगडीत सगळ्या समस्या दूर करेल, मग ते बद्धकोष्टता असो, गॅस असो किंवा रक्ताची कमतरता असो. सांधेदुखी असेल तर ती ठीक होईल. इथे आपण वापरणार आहोत गूळ. गुळाबद्दल तुम्हाला सर्वांनाच माहीती आहे की गूळ कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. आपल्या हाडांच्या वेदनांसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी गुळाचे सेवन आवश्यक आहे. गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते, त्यामुळे ते आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते. हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढविते गुळाचे सेवन. साखरेच्याऐवजी गुळाचे सेवन करा. चहा पण गुळाचा घेत जा.
गूळ खाणे खूप फायदेशीर
गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फोस्फोरस असतो व हा कॅल्शियम व फोस्फोरस आपल्या हाडांच्या निर्मितीसाठी, तसेच मजबुतीसाठी, वेदनांपासून आराम मिळण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आपल्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता असेल, तर आपल्या संधिवात, सांधेदुखी, कंबरदुखी असे आजार होतात. गूळ खाण्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. तुम्ही गूळ रात्रभर भिजवून पण खाऊ शकता. सकाळी उठल्यावर एक छोटा तुकडा गूळ खाणे खूप फायदेशीर आहे.
ही माहिती शेवटपर्यंत जरूर बघा. गूळ नेहमी गडद रंगाचा घ्या कारण त्यामध्ये पोषक तत्वांची मात्रा जास्त प्रमाणात असते. गूळ जेवढा जुना तेवढे त्याचे औषधी गुणधर्म जास्त असतात. रोज एक तुकडा जरूर खा.
तुम्ही गुळाचा एक छोटा तुकडा १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा.
गूळ प्रकृतीने गरम आहे त्यामुळे उन्हाळ्यात एक तुकडा गूळ घेऊन तो १ ग्लास पाण्यात रात्री भिजवून ठेवा व सकाळी ते पाणी प्या. मधुमेही लोकांनी घेऊ नये. सर्दी, खोकला, अंगदुखी, छातीत जमलेला कफ बाहेर काढण्यात गुळाचे सेवन फायदेशीर आहे. डोळ्यांची दृष्टी तेज होण्यासाठी गूळ उपयोगी आहे. काही लोक चण्याबरोबर, काही तिळाबरोबर गुळाचे सेवन करतात. आपली थकावट कमी करतो. अस्थमासाठी पण उपयोगी आहे. अनेक औषधे बनविण्यासाठी याचा उपयोग होतो. दुधाबरोबर पण तुम्ही घेऊ शकता. सकाळी उठल्यावर हलक्या गरम पाण्याबरोबर एक तुकडा गुळाचे सेवन करा. मी पण इथे पाणी गरम केले आहे. दिवसभर ऊर्जा राहील, घसा बसला असेल तर गरम
पाण्यात गूळ घालून सेवन करा.
१ ग्लास गरम दुधाबरोबर पण तुम्ही १ तुकडा गूळ खाऊ शकता. आपण जर आपल्या खानपानावर लक्ष दिले, तर आपण दीर्घ काळ
तंदुरुस्त राहू शकतो. गुळाच्या सेवनाने तुमच्या चेहर्यावर चमक येईल, केस गळणे थांबेल. पौष्टिक आहार घ्या.
भूक लागल्यावर चणे व गूळ खा. मधुमेही लोकांनी फक्त चण्याचे सेवन करायचे आहे. गूळ खाऊ नये. तुमची पचनशक्ति वाढवतो हा उपाय. गूळ तुमची रोगप्रतिकार शक्ति वाढवतो, त्यामुळे आजार होत नाहीत. रक्तदाब नियंत्रित ठेवते गुळाचे सेवन. गूळ व चण्याच्या सेवनाने आपले शरीर स्फूर्तिदायक राहाते. तिळाबरोबर पण तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. आपल्या स्वास्थ्यासाठी वरदान आहे “गूळ”.