औरंगाबाद

ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारुरकर यांचे निधन

औरंगाबाद / देवगिरी तरुण भारतचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्राचे माजी मुख्य माहिती आयुक्त आणि दिलीप धारूरकर यांचे सोमवार, १ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. गेले काही दिवस ते हेडगेवार रुग्णालयात उपचार घेत होते. शांत संयमी स्वभावामुळ ते अनेक नव्या पत्रकारांचे चाहते होते. दैनिक तरूण भारत मध्ये काम करताना त्यांनी शेकडे पत्रकार घडविले आहेत. त्यांच्या अचानक निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दिलीप धारुरकर
दिलीप धारुरकर

मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार, संपादक तथा राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांच्या निधनामुळे परखड पत्रकार आणि विचारवंत असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारुरकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. ‘अभ्यासू पत्रकार, संपादक म्हणून धारुरकर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. स्तंभलेखक, उत्तम वक्ते म्हणून ते परिचित होते. राज्याचे माहिती मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून धारुरकर स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

फडणवीसांकडून श्रद्धांजली

धारुरकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली आहे. माजी माहिती आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारूरकर जी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. विदर्भात माहिती आयुक्त म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आणि इतरही भागातील प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यासाठी मोठा पुढाकार त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतला. राष्ट्रवादी विचारांना बळकटी देणारे मोठे लेखन कार्य त्यांनी केले. एक उत्तम संपादक, वैचारिक स्तंभलेखक म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे उमुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker