संजय राऊत यांची अटक भ्रष्ट राजकारण्यांचा बुरखा फाडणारी
शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत (sanjay raut) यांना ED ने पत्राचाळ प्रकरणातील घोटाळ्यात आज ३१ जुलै रोजी दुपारी ४ वाजण्याचे दरम्यान अखेर अटक केली. महाराष्ट्रातील भ्रष्ट राजकारण्यांचा बुरखा पाडणारी ठरली आहे. यापुर्वी वेगवेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेल्या अनिल देशमुख, नवाब मलिक या बड्या नेत्याच्या अटकेनंतर मागील काही दिवसांपासून खा. संजय राऊत यांच्या अटकेचे तसे संकेत ही मिळत होते. आज खा. संजय राऊत यांना करण्यात आलेल्या अटकेमुळे या संकेतावर शिक्कामोर्तब झाले आहे एवढेच!
या सर्व प्रकरणाकडे जाण्यापुर्वी आपण ED हे काय प्रकरण आहे हे समजावून घेतले पाहिजे. ED म्हणजेच (Enforcement Directorate) म्हणजेच ज्याला आपण मराठी भाषेमध्ये अंमलबजावणी संचालनालय असे म्हणतात.
आर्थिक घोटाळे आणि पैशाचा गैरवापर किंवा व्यवसाय यांचा तपास करणे हे सक्त वसुली संचालनालयाचे (ED) चे मुख्य कार्य असते. केंद्र सरकार मधील महसूल विभाग आणि अर्थ मंत्रालय यांच्या अंतर्गत या सक्त वसुली संचालनालयाचे (ED) कामकाज चालते.
ED म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय ज्याची स्थापना १९५६ मध्ये दिल्ली येथे करण्यात आली. सक्त वसुली संचालनालयाची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे,
फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, १९९९९ (FEMA) आणि
प्रिवेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट,२००२ (PMLA).
वरील दोन कायद्यांचे उल्लंघन कुठल्याही क्षेत्रामध्ये होत असेल तर, त्या प्रकरणांमध्ये सक्त वसुली संचालनालया (ED) द्वारे तपासणी केली जाते. तसेच आर्थिक घोटाळे आणि पैशाचा गैरवापर करणाऱ्या लोकांविरोधात तपास करणे, अटक करणे, खटला दाखल करणे, मालमत्ता जप्त करणे असे विविध अधिकार ईडीला दिलेले आहेत. आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी ईडी कडून सक्त कारवाई केली जाते.
तसेच आपल्या देशामध्ये चाललेला काळाबाजार, बेहिशेबी मालमत्ता, कर कर चुकवणे आणि पैशांमधील घोटाळे इत्यादी संबंधीचे सर्व तपास ईडी द्वारे घेतले जातात.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या बड्या राजकीय लोकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) केलेल्या कारवाईत अटक केलेल्या व्यक्ती मध्ये खा. संजय राऊत यांचा चौथा क्रमांक आहे. यापुर्वी मंत्रीपदावर कार्यरत असलेल्या छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. यापैकी छगन भुजबळ यांची सुटका झाली तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक अजूनही कारागृहातच आहेत. आता या पाठोपाठ खा. संजय राऊत यांची अटक सक्त वसुली संचालनालयाने केली आहे.
शिवसेना खा. संजय राऊत यांच्या घरी आज ३१ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ED) धाड मारुन या संबंधीच्या कागदपत्रांची तपासणी केली. या तपासणीत पत्राचाळ प्रकरणातील गैरव्यवहारा संबंधित अनेक कागदपत्रे मिळाल्यामुळे त्यांना सायंकाळी ५ च्या सुमारास अटक केली.
पत्राचाळ प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात सक्त वसुली संचालनालयाने (ED) केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएल मधून १०० कोटी वळवण्यात आले. त्यानंतर प्रवीण यांनी ही रक्कम जवळच्या व्यक्तींच्या नावे फिरवली. यामध्ये कंपन्या, नातेवाईकांचा समावेश होता. २०१० मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील ५५ लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केलाय. ईडीने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्या खात्यावर पुन्हा ५५ लाख वळवले. याच कालावधीमध्ये इतरही व्यवहार झाल्याचं सक्तवसुली संचालनालयाने (ED) म्हटलंय.
सक्त वसुली संचालनालयाने (ED) महाराष्ट्रातील या बड्या नेत्यांवर केलेल्या या सर्व कारवाया या केंद्र सरकारच्या इषा-यावर करण्यात येत असल्याची चर्चा त्या त्या नेत्यांचे समर्थक करीत असले तरी या सर्व प्रकरणात या बड्या नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार ही नजर अंदाज करुन चालणार नाही. महाराष्ट्रातील या बड्या नेत्यांवर करण्यात आलेल्या या भ्रष्ट राजकारण्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडणा-या असल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ED) केलेल्या या कारवाईचे समर्थनच व्हायला हवे. किमान अशा कारवायांमुळे तरी अंधाधुंद पध्दतीने सुरु असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल.