अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात आ.धनंजय मुंडे यांनी केले ना.अजित पवार यांच्या वाहनाचे सारथ्य
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220731_092134.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220731_092134.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220731_092148.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220731_092148.jpg)
महाराष्ट्राच्या विविध भागांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी गडचिरोली सह विदर्भातील अनेक गावांचा दौरा करून आज मराठवाड्यातील अनेक गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातील माहुर येथे रेणुकामातेचे दर्शन घेऊन आपला पाहणी दौरा सुरु केलि. या पाणी दौ-यात अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केले.
या दौऱ्यात अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील माहुर, किंवा आदि तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी नुकसान गृस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्यक्ष भेटीत अश्रुचिंब नयनांनी तर अनेकांनी आपल्या व्यथा निवेदन देवून व्यक्त केल्या.
नांदेड जिल्ह्यातील माहुर आणि किंवा तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावातुल शेतजमिनी पिकांसह वाहुन गेल्यामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. यावेळी अजित पवार यांनी शेतकरी कष्टकऱ्यांच्या सोबत चर्चा करुन त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन तातडीने मदत करा व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश दिले. या संपुर्ण दौ-यात अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य माजी मंत्री तथा अजित पवार यांचे विश्वासू सहकारी आ. धनंजय मुंडे यांनी केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220731_092210.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220731_092210.jpg)
शेतकऱ्यांना मदत करा
या भागात जनावरांचा मृत्यू झाला, रस्त्यांची वाईट अवस्था आहे. पुन्हा पाऊस आला तर धरणातलं पाणी सोडलं तर नदीशेजारची गावात पाणी जाईल. त्यामुळे मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याला रात्री धरणावर ठेवायला हवं. तसेच मजुरांना एक एक महिन्याचं धान्य द्यावं. मुख्यमंत्री गडचीरोलीला गेले तेव्हा पुलावरुन पाहणी केली, पाहणी करणे हे त्यांचे कामंच आहे. ख्यमंत्र्यांकडे विमान असते सरकारी यंत्रणा असते. त्यामुळे ते आधी पाहणीसाठी गेले हे त्यांचं काम आहे, अशी वक्तव्यं करण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी अजित पवारांनी केलीय.
कुठली खाती कुणाकडे तेही सांगा?
सगळी खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. फडणवीस यांनी स्पष्ट करावं की कुठली खाती त्यांच्याकडे आहे आणि कुठली मुख्यमंत्र्यांकडे आहे, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. तर शेतकऱ्यांना मदत द्यायचं माझ्या हातात नाही, शिंदे – फडणवीस यांच्या हातात आहे. म्हणून अधिवेशन घ्या म्हटलं, पण हे ना अधिवेशन घेतात, ना विस्तार करत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
किती मदतीची मागणी?
आता केंद्राच्या विचाराचे सरकार आलंय, आता केंद्राने मदत करावी. शेतकऱ्यांची मागणी हेक्टरी 75 हजार रुपये मदत करावी ही आमची मागणी आहे. तसेच सरकारने यंदाचं पीक कर्ज माफ करायला हवं. तर मंत्रिमंडळ विस्तारासाठी कायदेशीर अडचण येते की नाही हे माहित नाही. मात्र या दोघांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, जोपर्यंत दिल्लीतून निर्णय होत नाही मंत्रीमंडळ विस्तार होत नाही. त्यामुळे आम्ही दोघेच सांभाळतो असा केविलवाणा प्रयत्न यांना करावा लागेल, असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.