अतिरिक्त जिल्हा अधिकाऱ्यांच्या घरातून पुष्पा स्टाईल चंदनाच्या झाडाची चोरी करण्याचा प्रयत्न




अंबाजोगाई / शासकीय निवासस्थानात राहणा-या येथुल अतिरिक्त जिल्हा अधिकारी मंजुषा मिस्टर यांच्या घरात अज्ञात चंदन चोरट्यांनी मध्यरात्री चंदनाच्या झाडावर डल्ला मारण्याच्या उद्देशाने सदरील झाड कापण्यास सुरुवात केले. मात्र कुत्र्याच्या भुंकण्याने मिसकर मॅडम यांना जाग आली खिडकीतून बाहेर पाहिले असता एक इसम त्यांना चंदनाचे झाड कापत असतांना दिसला. त्यांनी लगोलग पोलीसांना फोन करून यांची कल्पना दिली असल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे घर चोरट्यांच्या रडारवर
या संदर्भात अतिरिक्त जिल्हा अधिकारी मंजुषा मिसकर यांनी सांगितलेली माहिती अशी की,२७ जून रोजी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास कुत्र्याच्या आवाजामुळे मला जाग आली व मी माझ्या खिडकीच्या बाहेर पाहिले असता मला एक माणूस पळाल्याचा दिसला. सदर व्यक्ती यांनी डोक्याला काहीतरी पांढरे बांधले होते व गर्द कलरचा शर्ट घातल्याचे जाणवले .सदरच्या व्यक्तीवर कोण आहे बाहेर असे ओरडल्यानंतर तो निवासस्थानाच्या मागे जाऊन पळून गेला.
कुत्र्याच्या भुंकण्याने चोरट्यांचा डाव फसला
रात्री ०२:२५ मिनिटांनी माझ्या कार्यालयीन शिपाई याला फोन करून मी बोलून घेतले तसेच रात्री ०२:३३ वाजता शहर पोलीस चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना दूरध्वनीवरून त्वरित पोलीस पाठवन्या बाबत सूचना केल्या. सूचना केल्यानंतर सर्वसाधारणपणे लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु माझ्या घराचे पूर्ण आवर फिरून पाहिले असता कोणीही आढळून आले नाही परंतु माझ्या कंपाउंड वॉलच्या एका ठिकाणी चिखल लागलेला व हा चिखल पायाचा असल्याचे दिसून आले .त्यामुळे आलेला एक पोलीस कॉन्स्टेबल व मी याबाबत पाहणी केली. दहा ते पंधरा मिनिटं पोलीस तेथे थांबून पोलीस निघून गेले. परत तीन वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास माझ्या कुत्र्याचे भुंकण्याचे आवाज आल्यावरुन मी उठून खिडकीबाहेर कानोसा घेतला. त्यावेळेस मला काही कापत असल्याचा आवाज आला. त्यामुळे मी श्री पवार यांना ०३ वाजून ५३ मिनिटांनी व ०३ वाजून ५५ मिनिटांनी दोन वेळा फोन करून त्वरित पोलीस पाठवण्याबाबत सूचना दिल्या व सदर आवाजाची रेकॉर्डिंग ०३ वाजून ५७ मिनिटांनी केले .सर्वसाधारणपणे चार वाजता पोलीस गाडी आली.
गेली अनेक दिवसांपासून शहरात चोरांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असतांनाही आणि शहरात अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, उपविभागीय पोलीस अधीक्षक, शहर आणि ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन, दोन पोलीस निरीक्षक, असंख्य पोलीस उपनिरीक्षक आणि शेकडो पोलीस कर्मचारी असतांनाच एका वरीष्ठ महसुल अधिका-यांच्या घरी चोरटे एक वेळा नव्हे तर तसाच्या अंतराने पुन्हा प्रवेश करुन दोन वेळा चोरी करण्याचा प्रयत्न करतात ही बाब पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निष्क्रिय कामाकाजाचा पुरावा असल्याची चर्चा शहरात या निमित्ताने पुन्हा होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून शहरातील वाढत्या चो-यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.