अंबाजोगाई

श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा अंबाजोगाईत साजरा

Shri Sant Namdev Maharaj Sanjeevan Samadhi Ceremony celebrated in Ambajogai

अंबाजोगाई येथे संत नामदेव बी सी ग्रुप अंबाजोगाई व बीड जिल्हा शिंपी समाज यांच्या वतीने विश्व संत श्री नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व अभूतपूर्व अशा समाजबांधवांच्या प्रतिसादांमध्ये संपन्न झाला.

      सकाळ पासूनच पावसाच्या संततधारा चालू असतानासुद्धा 11.30वा शिवगड संस्थान उमराई येथील ह भ प श्री महारुद्र खाडे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरु झाला या कार्यक्रमांमध्ये समाजातील सर्व माता भगिनी व समाज बांधव भक्ती रसामध्ये अक्षरशः चिंब होऊन निघाले.

     कीर्तन ठीक 2.45 वा पार पडले नंतर विश्व संत श्री नामदेव महाराज यांच्या महाआरती चा कार्यक्रम संपन्न झाला आज झालेली महाआरती म्हणजे अंबाजोगाई येथील शिंपी समाजातील अतिशय ऐतिहासिकच म्हणावी लागेल कारण नामदेव महाराजांची आरती चालू असताना ह-भ-प खाडे महाराज यांचे शिष्य व रापतवार परिवारातील भगिनी व नांदेड येथील यन्नावार परिवारातील श्रीमती कमल भानुदास यन्नावार या वयोवृद्ध भगिनी सुद्धा या छोट्या बालकांसोबत आरती वर ठेका धरून फुगडी व नृत्य करत करत आरतीच्या भक्तिरसात चिंब होऊन निघाल्या यावेळी सर्व समाजातील माता भगिनी व बांधव यांनी सुद्धा ठेका धरून तल्लीन होऊन आरती मध्ये सहभाग घेतला.

     यानंतर लगेचच समाजातील गुणवंत प्रतिभावंत यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी  सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. महारुद्र महाराज खाडे प्रमुख अतिथी ज्येष्ठ समाज बांधव  तुळशीदासराव पल्लेवार काशिनाथराव रापतवार विश्वनाथराव गिरगिरवार बी सी ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य ज्येष्ठ कवी राजेंद्र रापतवार बीड जिल्हा शिंपी समाजाचे अध्यक्ष प्रवीण संगेवार उपस्थित होते त्यांच्या हस्ते समाजातील गुणवंत व प्रतिभावंत यांचा शाल,फेटा,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

    यामध्ये कु वैभवि सचिन गिरगिरवार हीने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षे मध्ये 87% गुण घेतल्याबद्दल तसेच कु श्रावणी बालाजी दरवेशवार हीने दहावी बोर्ड परीक्षेत 77 % गुण घेतल्याबद्दल डॉ मानसी संजय रापतवार हिने फिजिओथेरपिस्ट म्हणून पदवी मिळाल्याबद्दल  आशुतोष सुदर्शन रापतवार याची लोकशाही न्यूज चॅनेल मध्ये वेब इंजिनियर या पदी निवड झाल्याबद्दल तसेच श्री श्रीकांत बालाजी टेंभूरवार याने आय टी इंजिनियर होऊन इंटेल कंपनीमध्ये भरगच्च पॅकेजची नोकरी मिळविल्याबद्दल व श्री प्रशांत बालाजी टेंभूरवार याने पण कॉम्प्युटर इंजिनियर पदवी मिळवून मोठ्या कंपनीत नोकरी मिळाल्याबद्दल तसेच बीड येथील श्री आदित्य संजय माकुरवार याने रशिया देशात एम बी बी एस साठी प्रवेश मिळविल्याबद्दल व वरद उमाकांत दरवेशवार यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला

   यावेळी कु आकांक्षा रमेश सुरेवार हिने संत नामदेव महाराज यांच्या जीवन चरित्र विषयी छोटेखानी भाषण सादर केले. यानंतर संत नामदेव बी सी ग्रुपचे संस्थापक विजय रापतवार हे शिंपी समाज तसेच इतरही सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने सहभाग घेत असल्याबद्दल व पूर्ण काळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.

      शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम  संपन्न झाला यामध्ये समाज बांधव व इतर समाजातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

     सदरील सोहळ्या मध्ये अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर मोदी ज्येष्ठ साहित्यिक प्रसिद्ध कवी प्रा मुकुंद राजपंखे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मान्यवरांचा  समाजातर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker