मांजरा नदीच्या दुतर्फा १४ गावामध्ये १८ किमी मानवी साखळीतुन वृक्षलागवड
आपण नद्यांच्या काठावर झाडे का लावले पाहिजेत ?


लातूर / आपल्या देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक जिल्ह्याचे सरासरी वन क्षेत्र हे ३३ टक्के एवढे असणे आवश्यक आहे. मात्र लातूरचे वनाच्छादित क्षेत्र हे 0.6% टक्के एवढे अत्यल्प आहे. हे वाढविण्यासाठी मांजरा नदी काठी दुतर्फा 14 गावांमध्ये 10 किलोमीटर मानवी साखळीच्या माध्यमातून 28 हजार वृक्ष लागवडीचा एक अभिनव प्रयोग लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी मा.बी.पी.पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 24 जुलै 2022 रोजी ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात
आपण नद्यांच्या काठावर झाडे का लावले पाहिजेत ?
तज्ज्ञांच्या मते, गेल्या दहा वर्षांत, नदीच्या जवळील झाडे फार कमी झाली आहेत. सध्या जगात वाहत्या नदी जवळील झाले संपुष्ठात आली आहेत. त्यात हजारो मूळ झाडे आणि झुडुपे लुप्त झाले आहेत जे पाण्याची शुद्धता आणू जलजीवानाला वाढवण्यास मदत करते.
रिव्हर बेसिन अर्थात नदी पात्रातील झाडे बफर पुनर्संचयित करण्यासाठी मदत करते, नदीच्या प्रवाहातून अनेक अशुद्धी फिल्टर करते, नदी किनाऱ्याजवळील जमिनीची धूप कमी करते, मासे, पाणपक्षी आणि इतर वन्यजीवांचे अधिवास सुधारण्यात मदत करते आणि माती आणि जलसंधारण सुधारण्यासाठी दीर्घकालीन फायदे करून देते. नवीन लागवड तंत्रांचा प्रयोग करून रिपेरियन बफर लागवड वाढवण्यासाठी, देखभाल करण्याच्या संधी यातून तयार होतील.